'संपर्क अपलोड' या फीचरविषयी माहिती
'संपर्क अपलोड' हे पर्यायी फीचर आम्हाला तुमच्या डिव्हाइसच्या अॅड्रेस बुकमधील कोणते संपर्क WhatsApp वापरकर्ते आहेत हे तपासू देण्याची अनुमती देते. याचा असादेखील अर्थ आहे, की तुमचे जे संपर्क WhatsApp वापरत नाहीत, त्यांनी नंतर साइन अप केल्यावर आम्ही तुमची WhatsApp संपर्क सूची अपडेट करू शकतो. आम्हाला तुमच्या गोपनीयतेची काळजी आहे आणि Meta Platforms Inc. किंवा इतर Meta कंपन्यांनी आम्हाला त्यांच्या सेवा प्रदान केल्या, तरीही आम्ही तुमची संपर्क यादी त्यांच्या स्वतःच्या वापरासाठी त्यांच्यासोबत शेअर करत नाही.
तुम्ही 'संपर्क अपलोड' हे फीचर वापरता आणि WhatsApp ला तुमच्या डिव्हाइसच्या ॲड्रेस बुकचा ॲक्सेस देता, तेव्हा WhatsApp तुमच्या ॲड्रेस बुकमधील फोन नंबर्स सर्वसाधारणपणे दररोज ॲक्सेस व अपलोड करेल, परंतु ते WhatsApp वापरकर्ते आणि तुमचे इतर संपर्क किती वेळा WhatsApp वापरतात यासह अनेक घटकांवर अवलंबून असेल. तुमच्या डिव्हाइसच्या अॅड्रेस बुकमध्ये दिसतील अशी नावे, ईमेल ॲड्रेसेस इ. अशी इतर कोणतीही माहिती आम्ही गोळा करत नाही.
तुमचे काही संपर्क अद्याप WhatsApp वापरत नसल्यास, आम्ही त्यांचे फोन नंबर WhatsApp ला ओळखता येऊ नयेत अशा पद्धतीने व्यवस्थापित करून त्यांच्या गोपनीयतेचे रक्षण करतो. आम्ही हे त्यांच्या फोन नंबरची क्रिप्टोग्राफिक हॅश व्हॅल्यू तयार करून करतो आणि त्यानंतर नंबर हटवतो. प्रत्येक क्रिप्टोग्राफिक हॅश व्हॅल्यू WhatsApp च्या सर्व्हरवर स्टोअर केली जाते आणि WhatsApp वापरकर्त्यांनी हॅश होण्यापूर्वी अपलोड केलेल्या संबंधित फोन नंबर्सशी लिंक केली जाते, जेणेकरून ते संपर्क WhatsApp मध्ये सामील झाल्यावर आम्ही तुम्हाला त्यांच्याशी अधिक चांगल्या पद्धतीने कनेक्ट करू शकू.
तसेच, 'संपर्क अपलोड' फीचरचा गैरवापर होत आहे का हे पाहण्यासाठी आणि त्याला आळा घालण्यासाठी आम्ही स्वतंत्रपणे तुमच्या डिव्हाइसच्या अॅड्रेस बुकमधील फोन नंबर्सचे क्रिप्टोग्राफिक हॅश रिप्रेझेंटेशनदेखील तयार करतो. उदाहरणार्थ, अॅड्रेस बुकमध्ये नेहमीपेक्षा वेगळे बदल झाले आहेत की नाही हे निर्धारित करण्यासाठी आम्ही हॅशेसचे मूल्यांकन करतो. यामध्ये वैयक्तिक फोन नंबर्स ट्रॅक करणे किंवा त्यांची तुलना करणे समाविष्ट नसते.
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर आधारित सेटिंग्ज वापरून 'संपर्क अपलोड' हे फीचर नियंत्रित करू शकता. तुम्ही 'संपर्क अपलोड' हे फीचर न वापरण्याचा पर्याय निवडलात, तरी तुम्ही WhatsApp वापरणाऱ्या लोकांशी संवाद साधू शकता, परंतु कार्यक्षमता मर्यादित असेल.
WhatsApp चा जबाबदारीने वापर कसा करावा याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या मदत केंद्रामधील हा लेख पहा.