WhatsApp वर Facebook शॉप कसे पहावे
टीप: हे फीचर तुमच्यासाठी अद्याप उपलब्ध नसू शकते.
WhatsApp मुळे बिझनेसेसना त्यांची WhatsApp Business खाती Facebook शॉपला लिंक करता येतात. यामुळे ग्राहकांना WhatsApp न सोडता शॉपमधील प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस पाहणे सोपे जाते.
ज्या बिझनेसेसची खाती Facebook शॉपला लिंक केलेली आहेत, त्यांच्या नावासमोर चॅटमध्ये शॉपिंग बॅगचे चिन्ह दिसते.
WhatsApp मध्ये Facebook शॉप एक्सप्लोर करणे
- तुम्हाला ज्या बिझनेसचे शॉप एक्सप्लोर करायचे आहे, त्या बिझनेससोबतचे चॅट उघडा.
- त्यांच्या नावासमोर असलेल्या शॉपिंग बॅगच्या चिन्हावर टॅप करा.
- त्यांचे Facebook शॉप WhatsApp मध्ये उघडेल. इथून, विशिष्ट प्रॉडक्ट शोधण्यासाठी सर्च बार वापरा किंवा एखादा बिझनेस ऑफर करत आहे ती सर्व प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस एक्सप्लोर करण्यासाठी शॉपमध्ये स्क्रोल करा.