बिझनेसेससोबत चॅट करत असताना शॉपिंग कशी करावी
काही बिझनेसेस ग्राहकांसोबत चॅट करत असताना निवडक प्रॉडक्ट्सच्या सूची शेअर करण्याचा पर्याय निवडतात. या सूचीमुळे ग्राहकांना ते शोधत असलेली प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस आणखी सहजरीत्या शोधता येतात.
बिझनेसेससोबत चॅट करत असताना शॉपिंग करणे
- WhatsApp उघडा.
- चॅट टॅबवर जा > बिझनेससोबतच्या चॅटवर टॅप करा.
- तुम्ही कोणते प्रॉडक्ट शोधत आहात हे बिझनेसला सांगण्यासाठी मेसेज लिहा. पाठवा
वर टॅप करा. - बिझनेस अशा सूचींचा पर्याय वापरत असल्यास, ते त्यांच्या कॅटलॉगमधील तुमच्या विनंतीशी जुळणाऱ्या कमाल ३० निवडक प्रॉडक्ट्सची सूची शेअर करतील.
- सूचीवर टॅप करा. त्यानंतर, प्रॉडक्टचे तपशील पाहण्यासाठी प्रॉडक्टवर टॅप करा. एखाद्या विशिष्ट बाबीविषयी बिझनेसला मेसेज पाठवण्यासाठी बिझनेसला मेसेज पाठवा वर टॅप करा.
- तुम्हाला ऑर्डर करायचे आहे ते प्रॉडक्ट आढळल्यानंतर, कार्टमध्ये जोडा वर टॅप करा.
- टीप: एकाच प्रॉडक्टचे एकाहून अधिक नग ऑर्डर करण्यासाठी, तुम्हाला हवे तितके नग जोडले जाईपर्यंत कार्टमध्ये जोडा वर टॅप करत रहा.
- तुम्ही ऑर्डर करण्यासाठी तयार असाल, तेव्हा कार्ट पहा वर टॅप करा.
- तुम्हाला तुमच्या कार्टसोबत एखादी टीप जोडायची असल्यास, मेसेज जोडा वर टॅप करा. त्यानंतर, पाठवा
वर टॅप करा.
बिझनेसकडे तुमची कार्ट ऑर्डर पोहोचल्यानंतर, ते तुमच्या पेमेंट पर्यायांविषयी चर्चा करतील.