iPhone वरून Samsung फोनवर तुमचा WhatsApp डेटा मायग्रेट कसा करावा
तुम्ही iPhone वरून Samsung Android डिव्हाइसवर जात असाल, तर तुम्ही तुमची खाते माहिती, प्रोफाइल फोटो, वैयक्तिक चॅट्स, ग्रुप चॅट्स, पूर्वीचे चॅट, मीडिया आणि सेटिंग्ज ट्रान्सफर करू शकता. तुम्ही तुमच्या कॉल नोंदी किंवा दिसणारे नाव ट्रान्सफर करू शकत नाही.
मला कोणत्या गोष्टी लागतील?
- तुमच्या नवीन डिव्हाइसवर Samsung SmartSwitch ॲपची 3.7.22.1 किंवा त्यापुढील आवृत्ती इंस्टॉल केलेली असणे
- तुमच्या जुन्या डिव्हाइसवर WhatsApp iOS ची 2.21.160.17 किंवा त्यापुढील आवृत्ती असणे
- तुमच्या नवीन डिव्हाइसवर WhatsApp Android ची 2.21.16.20 किंवा त्यापुढील आवृत्ती असणे
- USB-C ते लाइटनिंग केबल (किंवा त्यासारखे अडॅप्टर्स)
- नवीन डिव्हाइसवर जुन्या डिव्हाइसवर वापरत होतात तोच फोन नंबर वापरणे
- तुमचे Android डिव्हाइस नवेकोरे असणे किंवा फॅक्टरी सेटिंग्जवर रिसेट केलेले असणे
iPhone वरून Samsung वर मायग्रेट कसे करावे
- तुमचा Samsung फोन सुरू करा आणि सूचना दिसल्यावर तो केबलने तुमच्या iPhone ला कनेक्ट करा.
- Samsung Smart Switch एक्स्पिरीयन्सचे पालन करा.
- सूचना दिसल्यावर, iPhone चा कॅमेरा वापरून नव्या फोनवर दिसणारा QR कोड स्कॅन करा.
- तुमच्या iPhone वर सुरू करा वर टॅप करा आणि प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट बघा.
- तुमचा नवा Samsung फोन सेट करणे सुरू ठेवा.
- होम स्क्रीनवर पोहोचल्यावर WhatsApp सुरू करा आणि तुम्ही तुमच्या जुन्या डिव्हाइसवर वापरत होतात त्याच फोन नंबरने लॉग इन करा.
- सूचना दिसल्यावर इम्पोर्ट करा वर टॅप करा आणि प्रक्रिया पूर्ण होऊ द्या.
- तुमचा नवा फोन सक्रिय करणे पूर्ण करा. त्यानंतर तुम्हाला तुमची चॅट्स दिसू लागतील.
टीप: तुम्ही तुमच्या जुन्या डिव्हाइसवरून तुमचा डेटा पुसेपर्यंत किंवा WhatsApp हटवेपर्यंत तुमचा डेटा तिथेच राहील.
माझ्या डेटाचे काय होते?
केबलने तुमचा डेटा स्थानिक पातळीवर ट्रान्सफर करणे म्हणजे:
- मायग्रेट केल्यामुळे ट्रान्सफर झालेला डेटा क्लाउड स्टोरेजवर जात नाही (पण हा डेटा तुम्ही चॅट बॅकअपद्वारे स्वतंत्रपणे तुमच्या क्लाउड स्टोरेजवर पाठवलेला असू शकतो).
- तुम्ही ट्रान्सफर केलेला डेटा WhatsApp पाहू शकत नाही.
मला माझ्या नव्या फोनवर कोणते मेसेजेस ट्रान्सफर करता येतील?
तुम्ही हे ट्रान्सफर करू शकता:
- वैयक्तिक मेसेजेस
तुम्ही हे ट्रान्सफर करू शकत नाही:
- पीअर टू पीअर पेमेंट मेसेजेस
मला माझ्या कॉल नोंदी ट्रान्सफर करता येतील का?
तुम्ही तुमच्या WhatsApp वरील कॉल नोंदी iPhone डिव्हाइसवरून Samsung डिव्हाइसवर ट्रान्सफर करू शकत नाही.