बिझनेसना त्यांच्या Facebook शॉपवरून WhatsApp वर मेसेज कसा पाठवावा
टीप: हे वैशिष्ट्य तुमच्यासाठी अद्याप उपलब्ध नसू शकते.
जेव्हा तुम्ही एखाद्या बिझनेसच्या Facebook शॉपला भेट देता, तेव्हा तुम्ही पाहत असलेल्या प्रॉडक्टबद्दल बिझनेसशी संभाषण सुरू करण्यासाठी तुम्ही मेसेज पाठवा बटण वापरू शकता.
WhatsApp Business ला त्यांच्या 'Facebook शॉप' वरून मेसेज करणे
- शॉपमधील प्रॉडक्ट पेजवरून, मेसेज पाठवा वर टॅप करा. त्यानंतर WhatsApp उघडेल आणि शॉपच्या WhatsApp Business खात्यासह चॅट सुरू करेल.
- तुम्हाला संभाषण सुरू करण्यात मदत करण्यासाठी, मजकूर फील्डमध्ये मेसेज टेम्पलेट दिसेल. तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते, तुम्ही हे टेम्पलेट संपादित करून करू शकता. तुम्ही शॉपमध्ये पाहत असलेल्या प्रॉडक्ट पेजची लिंकदेखील तुमच्या मेसेजमध्ये अटॅच केली जाईल.
किंवा वर टॅप करा.
थेट WhatsApp मध्ये प्रॉडक्ट पेज किंवा शॉप पाहण्यासाठी, तुम्ही बिझनेसला पाठवलेल्या मेसेजमध्ये अटॅच केलेल्या लिंकवर टॅप करा. शॉपवर असलेल्या प्रॉडक्ट पेजेसच्या लिंक्स WhatsApp मध्ये कशा शेअर करायच्या आणि पहायच्या ते जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
टीप: ज्या शॉप्सनी त्यांची प्राथमिक संपर्क पद्धत म्हणून WhatsApp निवडले आहे फक्त त्याच शॉप्ससाठी या पायऱ्या लागू होतात.