WhatsApp तुम्हाला तुमच्या संदेशातील मजकूर फॉरमॅट करण्याची अर्थात अक्षरांचे स्वरूप बदलण्यासाठी अनुमती देते. कृपया लक्षात ठेवा की, हे फीचर बंद करण्याचा कोणताही पर्याय नाही.
तुमचा संदेश इटॅलिक करण्यासाठी, मजकुराच्या दोन्ही बाजूला अंडरस्कोअर लावा :
_मजकूर_
तुमचे संदेश बोल्ड करण्यासाठी, मजकुराच्या दोन्ही बाजूला एक एक अस्टेरिक अर्थात स्टार चिन्ह लावा :
*मजकूर*
तुमचे संदेश स्ट्राईक थ्रू करण्यासाठी, मजकुराच्या दोन्ही बाजूला एक एक टिल्डा चिन्ह लावा :
~मजकूर~
तुमचे संदेश मोनोस्पेस करण्यासाठी मजकुराच्या दोन्ही बाजूस तीन एकेरी अवतरण चिन्हे लावा :
```मजकूर```
टीप :
तुम्ही असेही करू शकता, तुम्ही Android आणि iPhone वर शॉर्टकट वापरू शकता.
Android : तुम्ही टेक्स्ट फील्डमध्ये टाकत असलेल्या मजकुरावर टॅप करून धरून ठेवा नंतर बोल्ड, इटॅलिक किंवा आणखी
iPhone : तुम्ही टेक्स्ट फील्ड मध्ये टाकत असलेला मजकूर > निवडा वर टॅप करा किंवा सर्व निवडा > B_I_U निवडा. नंतर, बोल्ड, इटॅलिक, स्ट्राईक थ्रू किंवा मोनोस्पेस निवडा.