'एकदाच पहा' विषयी
अतिरिक्त गोपनीयतेसाठी, प्राप्तकर्त्याने एकदा उघडल्यानंतर WhatsApp वरून नाहीसे होतील असे फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता. 'एकदाच पहा' हे फीचर वापरण्यासाठी WhatsApp अपडेट करून तुमच्या डिव्हाइसकरिता उपलब्ध असलेली नवीनतम आवृत्ती वापरा.
- या मीडिया फाइल्स प्राप्तकर्त्याच्या फोटो किंवा गॅलरी मध्ये सेव्ह होणार नाहीत.
- एकदाच पाहता येणारा फोटो किंवा व्हिडिओ पाठवल्यानंतर तुम्ही ते पुन्हा पाहू शकणार नाही.
- एकदाच पाहता येणाऱ्या मीडिया फाइल्स हे फीचर सुरू असताना पाठवलेले अथवा मिळालेले फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला फॉरवर्ड, सेव्ह, तारांकित किंवा शेअर करता येणार नाहीत.
- प्राप्तकर्त्याने वाचल्याची पोचपावती सुरू केली असेल, तर त्याने एकदाच पाहता येणारा फोटो किंवा व्हिडिओ उघडला आहे की नाही हेच फक्त तुम्हीच पाहू शकता.
- तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ पाठवल्यानंतर १४ दिवसांच्या आत ते उघडले गेले नाहीत, तर चॅटमधून मीडिया फाइल्स एक्स्पायर होतील.
- प्रत्येक वेळी एकदाच पाहता येणारा फोटो किंवा व्हिडिओ पाठवत असताना तुम्ही एकदाच पाहता येणाऱ्या मीडिया फाइल्स हे निवडणे आवश्यक आहे.
- मेसेजेसचा बॅकअप घेत असताना एखादा मेसेज उघडलेला नसेल, तर त्यातील एकदाच पाहता येणाऱ्या मीडिया फाइल्स बॅकअपमधून पुन्हा स्टोअर केल्या जाऊ शकतात. फोटो किंवा व्हिडिओ आधीच उघडला असेल, तर त्या मीडिया फाइल्स बॅकअपमध्ये समाविष्ट केल्या जाणार नाहीत आणि त्या पुन्हा स्टोअर केल्या जाऊ शकत नाहीत.
टीप:
- एकदाच पाहता येणाऱ्या मीडिया फाइल्स हे फीचर सुरू असताना केवळ तुमच्या विश्वासातल्या लोकांनाच फोटो किंवा व्हिडिओ पाठवा. कारण एखादी व्यक्ती:
- मीडिया फाइल नाहीशी होण्यापूर्वी तिचा स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग घेऊ शकते. एखाद्या व्यक्तीने मीडिया फाइलचा स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग घेतल्यास तुम्हाला सूचित केले जाणार नाही.
- मीडिया फाइल नाहीशी होण्यापूर्वी तिचा कॅमेऱ्याने किंवा इतर डिव्हाइसने फोटो किंवा व्हिडिओ घेऊ शकते.
- तुम्ही पाठवल्यानंतर एन्क्रिप्ट केलेल्या मीडिया फाइल्स WhatsApp च्या सर्व्हरवर काही आठवड्यांसाठी स्टोअर केल्या जाऊ शकतात.
- प्राप्तकर्त्याला एकदाच पाहता येणाऱ्या मीडिया फाइल्सची तक्रार नोंदवायची असल्यास त्या मीडिया फाइल्स WhatsApp ला दिल्या जातील. WhatsApp वर मेसेजेसची तक्रार कशी नोंदवावी हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर एकदाच पाहता येणाऱ्या मीडिया फाइल्स कशा पाठवाव्यात आणि उघडाव्यात: Android | iPhone | KaiOS | वेब आणि डेस्कटॉप