“अखेरचे पाहिलेले” आणि “ऑनलाइन” विषयी माहिती
तुमचे संपर्क ऑनलाइन आहेत का किंवा त्यांनी अखेरीस केव्हा WhatsApp वापरले, हे तुम्हाला “अखेरचे पाहिलेले” आणि “ऑनलाइन” या फीचर्सच्या मदतीने कळते.
संपर्क ऑनलाइन असेल, तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीच्या डिव्हाइसवर WhatsApp फोरग्राउंडवर सुरू असून ते इंटरनेटशी जोडले गेलेले आहे असा होतो. याचा अर्थ असा नाही, की त्यांनी तुमचा मेसेज वाचला असेल.
“अखेरचे पाहिलेले” मधून त्या व्यक्तीने WhatsApp अखेरीस कधी वापरले होते हे कळते. आमच्या गोपनीयता सेटिंग्जमधून तुम्ही तुमचे “अखेरचे पाहिलेले” कोण पाहू शकते ते नियंत्रित करू शकता. एखादी व्यक्ती तुम्हाला संपर्क म्हणून सेव्ह करत नाही तोपर्यंत किंवा ते तुम्हाला मेसेज करत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्यांचे "ऑनलाइन" स्टेटस पाहू शकणार नाही. कृपया याची नोंद घ्या, की तुमचे "ऑनलाइन" स्टेटस कोण पाहू शकते हे तुम्ही सेटिंग्जमध्ये नियंत्रित करू शकत नाही.
पुढील काही कारणांमुळे तुम्ही तुमच्या संपर्काचे “अखेरचे पाहिलेले” स्टेटस बघू शकत नाही:
- त्यांनी कदाचित त्यांच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये ही माहिती लपवण्याची सोय केली असेल.
- तुम्ही कदाचित तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये ही माहिती शेअर न करण्याची सोय केली असेल. तुम्ही तुमचे “अखेरचे पाहिलेले” शेअर केले नसेल, तर तुम्ही इतरांचे “अखेरचे पाहिलेले” पाहू शकत नाही.
- त्यांनी कदाचित तुम्हाला ब्लॉक केलेले असेल.