फॉरवर्ड करण्यावरील मर्यादांविषयी माहिती
तुम्ही एखादा मेसेज एका वेळी कमाल पाच चॅट्सना फॉरवर्ड करू शकता. एखादा मेसेज आधीच फॉरवर्ड केला गेला असेल, तर तुम्ही तो कमाल एका ग्रुप चॅटला आणि कमाल पाच चॅट्सना फॉरवर्ड करू शकता.
पण, एखादा मेसेज पाच किंवा अधिक चॅट्समधून फॉरवर्ड होतो, तेव्हा त्याचा अर्थ मूळ लेखकाने मेसेज पाठवल्यापासून त्या मेसेजने किमान पाच चॅट्सचा प्रवास केलेला आहे असा होतो. अशा मेसेजला दुहेरी बाणाचे चिन्ह
फॉरवर्ड केलेले मेसेजेस एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात
एखादा मेसेज किती वेळा फॉरवर्ड होतो आहे याचा माग ठेवण्यासाठी फॉरवर्ड केलेल्या मेसेजेसमध्ये एक काउंटर असतो. तुमची गोपनीयता सुरक्षित ठेवण्यासाठी, एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनमध्ये तुम्ही एखादा मेसेज किती वेळा फॉरवर्ड केला होता आणि त्या मेसेजमध्ये काय होते, याची माहिती WhatsApp ठेवत नाही. ते कसे करावे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनबद्दलचा हा लेख पहा.
संबंधित लेख:
पुढील प्लॅटफॉर्म्सवर मेसेजेस कसे फॉरवर्ड करावेत: Android | iPhone | वेब आणि डेस्कटॉप | KaiOS