एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअपविषयी माहिती
तुम्ही ज्या व्यक्तीशी संभाषण करत आहात ती व्यक्ती आणि खुद्द तुम्ही, हेच फक्त ते संभाषण वाचू अथवा ऐकू शकतात, अन्य कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही - अशी ग्वाही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन देते. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअपच्या मदतीने तुम्ही तुमच्या iCloud किंवा Google Drive वरील बॅकअपलाही समतुल्य संरक्षण जोडू शकता.
पासवर्डचे संरक्षण
तुम्ही एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप तयार करता, तेव्हा तुमचे मेसेजेस आणि मीडिया फाइल्स हे सर्व क्लाउडमध्ये स्टोअर केले जाते व पासवर्ड किंवा ६४ अंकी एन्क्रिप्शन की वापरून सुरक्षित केले जाते. तुमच्याकडे तुमचा मागील पासवर्ड किंवा एन्क्रिप्शन की यांचा ॲक्सेस आहे तोपर्यंत तुम्ही तुमचा पासवर्ड कधीही बदलू शकता.
टीप: तुम्ही तुमची WhatsApp चॅट्स गमावल्यास आणि तुमचा पासवर्ड किंवा एन्क्रिप्शन की विसरल्यास, तुम्ही तुमचा बॅकअप रिस्टोअर करू शकणार नाही. WhatsApp तुमचा पासवर्ड रिसेट करू शकत नाही किंवा तुमचा बॅकअप रिस्टोअर करू शकत नाही.
एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप बंद करणे
तुम्ही तुमचा पासवर्ड किंवा एन्क्रिप्शन की वापरून अथवा तुमचे बायोमेट्रिक्स किंवा डिव्हाइस पिन ऑथेंटिकेट करून एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप बंद करू शकता. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप बंद केल्यास, तुम्ही क्लाउडवर तुमच्या मेसेजेस आणि मीडिया फाइल्सचा बॅकअप घेण्याविषयीचे सेटिंग केल्याशिवाय यापुढे त्यांचा बॅकअप घेतला जाणार नाही.
iPhone वरील डिव्हाइस स्तरावरील बॅकअप्स
तुम्ही तुमच्या संपूर्ण iPhone साठी iCloud बॅकअप सुरू केला असल्यास, तुमच्या पूर्वीच्या चॅटच्या एन्क्रिप्ट न केलेल्या आवृत्तीचाही iCloud वर बॅकअप घेतला जातो. तुमची WhatsApp चॅट्स आणि मीडियाचा एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनसह बॅकअप घेतला जात आहे याची खात्री करण्यासाठी, तुमच्या डिव्हाइसवर iCloud बॅकअप बंद करा.
आम्ही तुमचा डेटा, ज्यामध्ये एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअपचाही समावेश होतो, कशाप्रकारे गोळा करतो आणि त्यावर कशाप्रकारे प्रक्रिया करतो याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी, कृपया WhatsApp चे गोपनीयता धोरण पहा.
संबंधित लेख:
- एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड बॅकअप सुरू आणि बंद कसा करावा
- एन्क्रिप्टेड बॅकअपचा पासवर्ड आठवत नाही