तुम्ही 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू करून WhatsApp वर असे मेसेजेस पाठवू शकता जे कालांतराने नाहीसे होतील. हे फीचर सुरू केल्यावर कोणत्याही व्यक्तीला किंवा ग्रुप चॅटला पाठवले जाणारे नवे मेसेजेस सात दिवसांनी नाहीसे होतील. तुमची सर्वात अलीकडील निवड ही चॅटमधील सर्व मेसेजेसना लागू होते. या सेटिंगचा तुम्ही ते सेटिंग सुरू करण्याआधी पाठवलेल्या किंवा तुम्हाला मिळालेल्या मेसेजेसवर परिणाम होत नाही. वैयक्तिक चॅटमध्ये ज्या दोन व्यक्तींमध्ये चॅट सुरू आहे त्यापैकी कोणीही 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू किंवा बंद करू शकते. ग्रुप चॅट असल्यास केवळ ग्रुप ॲडमीनच 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू किंवा बंद करू शकतात.
- हे सेटिंग सुरू केल्यानंतर एखाद्या वापरकर्त्याने सात दिवस WhatsApp उघडलेच नाही, तर त्याला आलेले मेसेजेस एक्स्पायर होतील. पण WhatsApp उघडले नाही तरी आलेल्या मेसेजेसचे पूर्वावलोकन नोटिफिकेशन्समधून करता येऊ शकते.
- सर्वसाधारणपणे, तुम्ही एखाद्या मेसेजला उत्तर देता तेव्हा तो मेसेज कोट केला जातो. पण तुम्ही 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर सुरू केले असल्यास, कोट केलेला मेसेज सात दिवसांनंतरही उपलब्ध असू शकतो.
- ज्या चॅटमध्ये 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' बंद आहे अशा चॅटला एक्स्पायर होणारा मेसेज पाठवल्यास आणि तो मेसेज फॉरवर्ड झाल्यास, तो मेसेज एक्स्पायर होणार नाही.
- एखाद्या वापरकर्त्याने मेसेज एक्स्पायर होण्यापूर्वी बॅकअप घेतला असल्यास ते मेसेजेस बॅकअपमध्ये उपलब्ध असतील. मात्र, बॅकअप रिस्टोअर केल्यानंतर ते एक्स्पायर होणारे मेसेजेस बॅकअपमधून हटवले जातील.
टीप: 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' हे फीचर फक्त तुमच्या विश्वासातील व्यक्तींसोबतच वापरा. कारण एखादी व्यक्ती:
- एक्स्पायर होणारा मेसेज फॉरवर्ड करू शकते किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकते, थोडक्यात तो एक्स्पायर होण्यापूर्वी सेव्ह करून ठेवू शकते.
- मेसेज एक्स्पायर होण्यापूर्वी त्यातील आशय कॉपी करून सेव्ह करू शकते.
- एक्स्पायर होणाऱ्या मेसेजचा तो एक्स्पायर होण्यापूर्वी कॅमेऱ्याने किंवा इतर डिव्हाइसने फोटो घेऊ शकते.
एक्स्पायर होणाऱ्या मेसेजेसमधील मीडिया फाइल्सचे काय होते
तुम्हाला WhatsApp वर मिळणाऱ्या मीडिया फाइल्स बाय डिफॉल्ट तुमच्या फोटोंमध्ये सेव्ह होतात. 'एक्स्पायर होणारे मेसेजेस' सुरू असल्यास, चॅटमधून पाठवलेल्या मीडिया फाइल्स चॅटसोबत नाहीशा होतील, मात्र 'ऑटो-डाउनलोड' सुरू असल्यास त्या तुमच्या फोनवर सेव्ह होतील. तुम्ही WhatsApp सेटिंग्ज > स्टोरेज आणि डेटा मध्ये ऑटो-डाउनलोड बंद करू शकता.
संबंधित लेख: