WhatsApp वर वैयक्तिक खाते आणि बिझनेस खाते यामधील फरक समजणे सोपे आहे. वैयक्तिक चॅटमध्ये, संपर्काच्या नावावर टॅप करून त्यांचे प्रोफाइल पहा. ते बिझनेस खाते असल्यास, त्यांच्या प्रोफाइलमध्ये खालीलपैकी एक लेबल असेल:
- अधिकृत बिझनेस खाते: हे खाते या लक्षणीय आणि विश्वासार्ह ब्रँडच्या मालकीचे आहे हे WhatsApp ने निर्धारित केले आहे. “अधिकृत व्यवसाय खात्याच्या” प्रोफाइलमध्ये आणि चॅटमधील शीर्षकाच्या बाजूला हिरवी बरोबरची खूण असते. तुम्ही त्या बिझनेसला तुमच्या ॲड्रेस बुकमध्ये जोडले नसले तरीही तुम्हाला त्याचे नाव दिसते.
- बिझनेस खाते: ही WhatsApp Business प्रॉडक्ट्स मध्ये मोडणाऱ्या एखाद्या प्रॉडक्टच्या बिझनेस खात्याची डीफॉल्ट स्थिती असते.
टीप: एखादे खाते "अधिकृत बिझनेस खाते" आहे याचा अर्थ WhatsApp त्यांच्या बिझनेसला समर्थन देते असा होत नाही.
संबंधित लेख: