सर्व WhatsApp खाती ही मोबाइल नंबरशी निगडीत असतात. जुने फोन नंबर नवीन वापरकर्त्यांसाठी परत वापरायला काढणे हे मोबाइल कंपन्या अनेकवेळा करतात त्यामुळे हे शक्य आहे की तुमचा सध्याचा फोन नंबरचा जुन्या मालकाचे नाव WhatsApp खात्यावर दिसत असेल.
जर तुमच्या फोन नंबरच्या जुन्या मालकाने त्याचे जुने WhatsApp खाते डिलीट केले नसेल तर तुम्ही तुमचे नवीन खाते सक्रिय करण्याआधी तुमच्या संपर्कांना तुमचा हा फोन नंबर आधीपासूनच WhatsApp मध्ये दिसू शकतो. तुम्हाला कदाचित दुसऱ्या कोणाचा तरी फोटो आणि 'माझ्याबद्दल' माहिती हे तुमच्या नंबरशी निगडीत असलेले दिसू शकते.
याची फार चिंता करू नका. याचा फक्त एवढाच अर्थ आहे की जुने खाते काढून टाकण्यात आलेले नाही आणि म्हणून सिस्टिममध्ये अजूनही जुनीच माहिती दिसत आहे. याचा अर्थ असा मुळीच नाही की जुन्या फोन नंबर मालकाला तुम्ही सक्रिय करू इच्छित असलेल्या WhatsApp खात्याचा काही ऍक्सेस आहे. तुमची WhatsApp वरून होणारी सर्व संभाषणे सुरक्षित असतील.
या प्रकारचे फोन नंबर पुनर्वापराविषयीचे गोंधळ टाळण्यासाठी आम्ही खात्याची निष्क्रियता सचोटीने पहात असतो. जर खाते ४५ दिवस निष्क्रिय असेल आणि ते त्यानंतर नवीन फोनवर नव्याने सक्रिय झाले तर आम्ही हा नंबर पुन्हा वापरण्यात आला आहे याचा संकेत समजतो. या वेळी जुन्या खात्याशी निगडीत असलेला डेटा जसे की प्रोफाइल फोटो आणि 'माझ्याबद्दल' माहिती आम्ही काढून टाकतो.