कॅटलॉग कसा पाहावा
कॅटलॉगमध्ये बिझनेसची प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस पाहता येतात. एखाद्या बिझनेसने त्यांचा कॅटलॉग तयार केला असेल, तर तो त्यांच्या बिझनेस प्रोफाइलमध्ये दिसतो.
एखाद्या बिझनेसचा कॅटलॉग पाहण्यासाठी:
- बिझनेससोबतचे चॅट उघडा.
- एखाद्या बिझनेसचे WhatsApp Business प्रोफाइल पाहण्यासाठी त्यांच्या बिझनेस नावावर टॅप करा.
- कॅटलॉग च्या बाजूला असलेल्या सर्व पहा वर टॅप करा.
याशिवाय, त्या बिझनेसचा ॲक्टिव्ह कॅटलॉग असल्यास, तुम्ही त्या बिझनेससोबत सुरू असलेल्या चॅटमधील शॉपिंग बटणावर (Android वरील
तुम्ही एखाद्या बिझनेसचा कॅटलॉग पाहू शकता आणि तो संपूर्ण कॅटलॉग किंवा त्यातील विशिष्ट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस तुमच्या मित्रमैत्रीणींसोबत शेअर करू शकता. त्यासाठी तुम्ही खालीलपैकी एक पर्याय वापरू शकता:
- WhatsApp द्वारे लिंक पाठवा: हा पर्याय वापरून तुम्ही संपूर्ण कॅटलॉग किंवा त्यातील विशिष्ट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस WhatsApp वरून इतरांसोबत शेअर करू शकता
- लिंक कॉपी करा: हा पर्याय वापरून तुम्ही लिंक कॉपी करू शकता
- लिंक शेअर करा: हा पर्याय वापरून तुम्ही निवडलेले प्रॉडक्ट/सर्व्हिस किंवा कॅटलॉग ईमेल किंवा इतर मेसेजिंग ॲप्सवरून शेअर करू शकता
संबंधित लेख:
कॅटलॉगवरून पुढील प्लॅटफॉर्म्सवर प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस कशा शेअर कराव्यात: Android | iPhone | वेब आणि डेस्कटॉप