WhatsApp Business वर 'कार्ट' हे फीचर कसे वापरावे
WhatsApp Business वापरकर्ता म्हणून तुमच्यासाठी 'कार्ट' हे फीचर आपोआपच उपलब्ध करून दिले जाईल. हे फीचर वापरण्यासाठी तुम्ही आणि तुमचे ग्राहक या दोघांकडेही WhatsApp ची नवीनतम आवृत्ती असणे आवश्यक आहे.
ऑर्डरवर प्रक्रिया करणे आणखी सोपे आणि कार्यक्षम व्हावे यासाठी हे फीचर तयार करण्यात आले आहे.
कार्ट्स सुरू किंवा बंद करणे
कार्ट्स फीचर सुरू किंवा बंद करण्यासाठी, WhatsApp Business ॲप उघडा. त्यानंतर पुढील पायऱ्या पूर्ण करा:
Android
- आणखी पर्याय > बिझनेस टूल्स > कॅटलॉग यावर टॅप करा.
- आणखी पर्याय > सेटिंग्ज यावर टॅप करा.
- तुमच्या ग्राहकांना कार्ट्स दिसाव्यात यासाठी कार्टमध्ये टाका सुरू करा. फीचर बंद करण्यासाठी कार्टमध्ये टाका बंद करा.
iPhone
- सेटिंग्ज > बिझनेस टूल्स > कॅटलॉग वर टॅप करा.
- आणखी > सेटिंग्ज वर टॅप करा.
- तुमच्या ग्राहकांना कार्ट्स दिसाव्यात यासाठी कार्टमध्ये टाका सुरू करा. फीचर बंद करण्यासाठी कार्टमध्ये टाका बंद करा.
वेब/डेस्कटॉप
- तुमच्या चॅटलिस्टच्या सर्वात वर असलेल्या आणखी
| > कॅटलॉग यावर क्लिक करा. - त्यानंतर, आणखी
| > सेटिंग्ज यावर क्लिक करा. - कार्टमध्ये टाका विभागामध्ये, तुमच्या ग्राहकांना कार्ट्स दिसाव्यात यासाठी सुरू करा वर क्लिक करा. फीचर बंद करण्यासाठी बंद करा वर क्लिक करा.
टीप:
- ग्राहकांना त्यांच्या कार्टमध्ये जोडलेली प्रॉडक्ट्स स्वतःच चेक आउट करता येणार नाहीत.
- तुम्ही तुमची कार्ट्स सेटिंग्ज बदलता, तेव्हा तो बदल दिसण्यासाठी कमाल २४ तास लागू शकतात. तुम्ही कार्ट्स फीचर बंद केले, तरीही त्यानंतरच्या २४ तासांच्या कालावधीमध्ये तुम्हाला ग्राहकांकडून आणखी कार्ट्स मिळू शकतात.