तुमचे WhatsApp Business खाते Facebook शॉपशी कसे लिंक करावे
टीप: हे फीचर तुमच्यासाठी अद्याप उपलब्ध नसू शकते.
तुमचे WhatsApp Business खाते तुमच्या Facebook शॉपशी लिंक केल्याने, ज्या ग्राहकांनी तुमच्या शॉपला भेट दिली आहे त्यांना WhatsApp Business ॲपद्वारे तुम्हाला मेसेज पाठवण्याचा पर्याय उपलब्ध होतो.
तुमची खाती लिंक करण्यासाठी, तुम्ही पुढील गोष्टी करणे आवश्यक आहे:
- WhatsApp Business खाते तयार करा.
- तुमच्या Facebook बिझनेस मॅनेजर खात्यावर ॲडमिन व्हा.
- तुमचे Facebook पेज आणि कॅटलॉग एकाच बिझनेस मॅनेजर खात्यामध्ये लिंक करा.
- Facebook पेजसाठी पेज व्यवस्थापित करण्याची आणि बिझनेस मॅनेजर वरील कॅटलॉगसाठी कॅटलॉग व्यवस्थापित करण्याची परवानगी घ्या.
तुमचे WhatsApp Business खाते तुमच्या शॉपशी लिंक करणे
सर्वप्रथम, Facebook कॉमर्स मॅनेजर मध्ये शॉप तयार करा. ते कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
त्यानंतर, तुमच्या शॉपमध्ये तुमचा WhatsApp Business नंबर जोडा आणि प्राथमिक संपर्क पद्धत म्हणून WhatsApp ला जोडा. या पायऱ्या कशा पूर्ण कराव्या याबाबत तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी हा लेख पहा.