WhatsApp ची भाषा कशी बदलावी
WhatsApp हे ॲप iPhone वर ४०हून अधिक भाषांमध्ये आणि Android वर तब्बल ६० भाषांमध्ये उपलब्ध आहे. तुमचा फोन ज्या भाषेवर सेट आहे, WhatsApp त्या भाषेमध्ये दिसते. जसे की, तुमचा फोन इंग्रजी भाषेवर सेट केलेला असेल, तर WhatsApp इंग्रजीमध्येच दिसेल.
तुमच्या फोनची भाषा बदलण्यासाठी:
Android: तुमच्या फोनमध्ये सेटिंग्ज > सिस्टम > भाषा आणि इनपुट > भाषा येथे जा. तुमचा फोन ज्या भाषेवर सेट केला आहे ती भाषा धरून ठेवा आणि वरपर्यंत न्या किंवा भाषा जोडा
वर टॅप करा.iPhone: iPhone मधील Settings
> General > Language & Region > iPhone Language येथे जा. तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा आणि Change to {language} वर टॅप करा.KaiOS: ॲप्स मेनूमधीलसेटिंग्ज वर प्रेस करा. त्यानंतर, उजवीकडे स्क्रोल करून पर्सलनाइझ करा वर प्रेस करा. नंतर, खालील बाजूस स्क्रोल करून भाषा वर जा आणि भाषा वर प्रेस करा. तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा आणि ठीक आहे वर किंवा निवडा वर प्रेस करा.
तुम्ही जी भाषा निवडली आहे ती WhatsApp मध्ये दिसायला लागेल.
काही निवडक देशांमध्ये पुढील पर्याय उपलब्ध आहे
तुम्ही जर Android फोन वापरत असाल, तर तुम्ही WhatsApp मधूनही ॲपची भाषा बदलू शकता. तुम्हाला हा पर्याय दिसत नसल्यास तुमच्या देशामध्ये या फीचरला सपोर्ट नाही असे समजावे. हा पर्याय पाहण्यासाठी:
- WhatsApp उघडा.
- अधिक पर्याय
> सेटिंग्ज > चॅट > ॲपची भाषा यावर टॅप करा. - तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा.