WhatsApp Business ॲपमध्ये 'शॉप्स' चे इंटिग्रेशन करण्याविषयी माहिती
टीप: हे फीचर तुमच्यासाठी अद्याप उपलब्ध नसू शकते.
Facebook शॉप्स हे टूल बिझनेस मालकांना त्यांच्या बिझनेससाठी कस्टमाइझ केलेले शॉपिंग अनुभव तयार करू देते आणि ते अनुभव Facebook च्या ॲप्सवर अखंडपणे इंटिग्रेट करू देते. बिझनेस मालक त्यांच्या शॉपच्या माध्यमातून त्यांची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस प्रदर्शित करू शकतात आणि संभाव्य ग्राहकांशी जोडले जाऊ शकतात. कोणत्याही वाढत्या बिझनेससाठी हे अतिशय महत्त्वाचे टूल आहे.
टीप: फक्त WhatsApp Business ॲपवर नोंदणी केलेले फोन नंबर्स शॉपसोबत लिंक केले जाऊ शकतात.