WhatsApp Business खाते Facebook पेजेसशी सिंक करण्याविषयी माहिती
WhatsApp Business खाते वापरत असताना तुम्ही तुमचे Facebook पेज तुमच्या WhatsApp Business खात्याशी लिंक करू शकता. तुम्ही तुमच्या Facebook पेजवरील बिझनेस माहिती तुमच्या WhatsApp Business खात्याशी सुसंगत करणे अर्थात सिंक करणे देखील निवडू शकता.
लिंक करण्यासाठी वापरकर्त्यांकडे पुढील गोष्टी असणे गरजेचे आहे:
- त्यांच्या बिझनेससाठी सुरू केलेले Facebook पेज
- WhatsApp Business ॲप वरील खाते
- दोन्ही मोबाइल ॲप्सची नवीनतम आवृत्ती
तुमच्या WhatsApp Business खात्याशी Facebook पेज लिंक केल्यानंतर, तुम्ही त्या Facebook पेजवरील बिझनेसची माहितीदेखील तुमच्या WhatsApp Business खात्याशी सिंक करू शकता. यामुळे तुमचे WhatsApp Business खाते Facebook पेजवरील माहितीसह अपडेट केले जाईल.
सिंक सुरू केले, की लिंक केलेल्या Facebook पेजवरील पुढील बिझनेस माहिती WhatsApp Business ॲपवर आपोआप येईल:
- बिझनेस वेळापत्रक
- पत्ता
- वर्णन
- कॅटेगरी
- वेबसाइट URL
- ईमेल