WhatsApp Business ला Facebook आणि Instagram सह लिंक करणे
तुम्ही तुमचे WhatsApp Business खाते Facebook पेज आणि/किंवा Instagram प्रोफाइलसह लिंक करू शकता आणि तुमच्या ग्राहकांना तुमच्या बिझनेससोबत संवाद साधण्यासाठी आणखी एक पर्याय देऊ शकता. तुम्ही तुमचे Facebook पेज किंवा Instagram प्रोफाइल तुमच्या WhatsApp Business खात्यासह लिंक करता, तेव्हा तुमचा नंबर तुम्ही लिंक केलेल्या Facebook पेज आणि/किंवा Instagram प्रोफाइलवर संपर्क पर्याय म्हणून दिसेल. ग्राहकांना या संपर्क पर्यायावर टॅप करून तुम्हाला थेट WhatsApp वर मेसेज पाठवता येईल.
तुम्ही तुमच्या WhatsApp Business खात्यासह Facebook पेज लिंक केल्यानंतर, तुम्ही त्या Facebook पेजवरून तुमच्या WhatsApp Business खात्यावर बिझनेसची माहिती सिंक करू शकता. यामुळे तुमच्या Facebook पेजवरील माहिती तुमच्या WhatsApp Business प्रोफाइलवर आपोआप अपडेट होईल.