बिझनेसचे नाव हे त्या बिझनेसचे अथवा संस्थेचे निदर्शक असणे गरजेचे आहे.
बिझनेसचे नाव तयार करण्यासाठीचे नियम
"अधिकृत बिझनेस खाते" म्हणून मान्यता मिळण्यासाठी नाव तयार करताना पुढील गोष्टींची काळजी घ्या:
- नाव इंग्रजीमध्ये असल्यास, नावामध्ये सर्व कॅपिटल लेटर्सचा वापर करणे शक्य असणार नाही, याला संक्षिप्त रूपांचा अपवाद असेल. प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर कॅपिटल लिहिले तर चालेल परंतु, उभयान्वयी अव्ययाचे पहिले अक्षर कॅपिटल असू नये. उदाहरणार्थ:
- योग्य: Sweet Treats or Tammy's Burritos and Tacos
- अयोग्य: SWEET TREATS* किंवा Tammy's Burritos And Tacos
- शब्दांमध्ये अतिरिक्त रिकाम्या जागा असू नयेत. बिझनेसच्या नावामध्ये केवळ सिंगल स्पेस वापरावी.
- गरज नसलेली विरामचिन्हे वापरू नयेत
- इमोजी वापरू नयेत
- चिन्हे (उदाहरणार्थ: ®) वापरू नयेत
- एकामागे एक येणारी, अल्फा न्यूमेरिक नसलेली कॅरेक्टर्स (कॅरेक्टर्स जी अक्षर किंवा अंक नाहीत) वापरू नयेत
- पुढीलपैकी कोणतीही स्पेशल कॅरेक्टर्स वापरू नयेत: ~!@#$%^&*()_+:;"'{}[]\|<>,/?
टीप: ज्या बिझनेसचे नाव अगोदरपासून निश्चित आहे, अशा बिझनेससाठी हे नियम लागू असणार नाहीत. अशा वेळी WhatsApp Business मध्ये वापरलेल्या नावामध्ये बिझनेसच्या ब्रँडशी जुळण्यासाठी विरामचिन्हे, कॅपिटल लेटर्स इत्यादी असू शकतात.
तसेच, बिझनेस नावामध्ये खालील गोष्टीदेखील असू नयेत:
- व्यक्तीचे संपूर्ण नाव
- जेनेरिक अर्थात सर्वसाधारण संज्ञा (उदाहरणार्थ: फॅशन)
- सामान्य भौगोलिक स्थान (उदाहरणार्थ: मुंबई)
- तीनपेक्षा कमी कॅरेक्टर्स
बिझनेसच्या नावामध्ये "WhatsApp" या शब्दाचे कोणतेही स्वरूप वापरलेले चालणार नाही. आमच्या ब्रॅंड मार्गदर्शकतत्त्वे ला भेट देऊन अधिक जाणून घ्या.
टीप: तुमचे बिझनेस खाते "अधिकृत बिझनेस खाते" असेल आणि जर तुम्ही बिझनेसचे नाव बदलले तर, तुम्ही तुमच्या खात्याचे "अधिकृत बिझनेस खाते" हे स्टेटस गमावू शकता.