फोन कसा बदलावा याविषयी माहिती
तुम्ही तुमचा जुना फोन बदलून त्याच प्लॅटफॉर्मवरील नवा फोन वापरू शकता - जसे की, जुन्या Android फोनवरून नव्या Android फोनला स्विच करणे किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरील फोन वापरण्यास सुरुवात करू शकता - जसे की, जुना iPhone बदलून नवा Android वापरण्यास सुरुवात करणे.
त्याच प्लॅटफॉर्मवरील नवा फोन वापरणे
तुम्ही तुमचा जुना फोन बदलून त्याच प्लॅटफॉर्मवरील नवा फोन घेतला असेल, तर तुम्हाला तुमचे पूर्वीचे चॅट नव्या फोनवर ट्रान्सफर करता येईल. पुढील प्लॅटफॉर्म्सवर पूर्वीचे चॅट ट्रान्सफर कसे करता येईल याविषयी अधिक जाणून घ्या: Android | iPhone
वेगळ्या प्लॅटफॉर्मवरील नवा फोन वापरणे
तुम्ही तुमचा जुना फोन बदलून वेगळ्या प्लॅटफॉर्मवरील नवा फोन घेत असाल, तर:
- तुमचा प्रोफाइल फोटो, 'माझ्याबद्दल' मधील माहिती, तुमची वैयक्तिक चॅट्स व ग्रुप चॅट्स आणि सेटिंग्ज कायम ठेवली जातील.
- तुमचे पूर्वीचे चॅट एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर ट्रान्सफर करण्याची सुविधा सध्या iPhone वरून Android डिव्हाइसवर मायग्रेट करताना किंवा Android डिव्हाइसवरून iPhone वर मायग्रेट करताना उपलब्ध आहे. iPhone वरून Android डिव्हाइसवर मायग्रेट कसे करावे याविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख पहा. Android डिव्हाइसवरून iPhone वर मायग्रेट कसे करावे याविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख पहा.
तुमचा फोन नंबर कायम ठेवणे
नव्या फोनमध्ये WhatsApp शी लिंक असलेला जुना फोन नंबर कायम ठेवण्यासाठी फक्त तुमच्या नवीन फोनवर WhatsApp डाउनलोड करा आणि तुमच्या नंबरची पडताळणी करा.
नवीन फोन नंबर वापरणे
- नव्या फोनमध्ये WhatsApp शी नवा नंबर लिंक करण्यासाठी तुमच्या नवीन फोनवर WhatsApp डाउनलोड करा आणि नव्या नंबरची पडताळणी करा.
- तुमच्या जुन्या फोन नंबरशी लिंक केलेले WhatsApp खाते हटवा.
तुम्ही तुमच्या जुन्या फोन नंबरशी लिंक केलेले WhatsApp खाते हटवायला विसरला असाल आणि तुमच्याकडे तुमच्या जुन्या फोनचा ॲक्सेस नसल्यास, ४५ दिवसांच्या कालावधीनंतर तुमचा जुना फोन नंबर ज्या व्यक्तीला मिळाला आहे त्या व्यक्तीने त्यांच्या फोनवर तो फोन नंबर ॲक्टिव्हेट केल्यावर तुमच्या जुन्या नंबरशी लिंक असलेली सर्व खाते माहिती हटवली जाईल.
टीप: तुम्ही तुमचा जुना फोन दुसऱ्या व्यक्तीला देऊन टाकणार असाल किंवा तुमच्या मोबाइल प्रोव्हायडरला परत करणार असाल, तर त्यातील व एसडी कार्डमधील (फोनमध्ये एसडी कार्ड असल्यास) डेटा पुसायला विसरू नका. यामुळे तुमच्या WhatsApp मेसेजेससारखी तुमची इतर खाजगी माहितीदेखील दुसऱ्याच्या हातात पडणार नाही.