कॅटलॉगविषयी माहिती
WhatsApp Business ॲप वापरकर्ते कॅटलॉगच्या मदतीने त्यांची प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस त्यांच्या ग्राहकांसोबत सहजरीत्या शेअर करू शकतात. कॅटलॉग हा वापरकर्त्याच्या बिझनेस प्रोफाइलमध्ये दिसतो.
कॅटलॉगमधील प्रत्येक प्रॉडक्ट व सर्व्हिसला एक युनिक शीर्षक असते आणि त्यासोबत त्यांच्या किमती, वर्णन, वेबसाइटची लिंक आणि प्रॉडक्ट कोड अशी माहितीदेखील असते. या गोष्टींमुळे कॅटलॉगमध्ये एखाद्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसचा शोध घेणे सुलभ होते. बिझनेस मालक त्यांच्या कॅटलॉगमध्ये कमाल ५०० प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस अपलोड करू शकतात.
कॅटलॉग अप-टू-डेट असेल, तर सद्य आणि भावी ग्राहकांना तुमच्या प्रॉडक्ट्सची आणि सर्व्हिसेसची माहिती मिळून तुमच्या बिझनेसशी कनेक्ट करणे सोपे होते. कॅटलॉगमुळे ग्राहकांना ज्यात रस आहे ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस निवडून त्यांच्या संपर्कांसोबत शेअर करता येते किंवा त्यांबद्दल प्रश्न असल्यास बिझनेसला मेसेज पाठवता येतो.
कॅटलॉग शेअर करण्याच्या सुविधेमुळे छोट्या बिझनेसना त्यांचा कॅटलॉग प्रोमोट करून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येतो. WhatsApp Business वापरकर्ते त्यांच्याशी बिझनेसच्या संदर्भात संपर्क साधणाऱ्या ग्राहकांना त्यांचा संपूर्ण कॅटलॉग पाठवू शकतात. याचप्रमाणे, ते त्यांच्या कॅटलॉगची लिंक सोशल मीडियावर तसेच इतर प्लॅटफॉर्म्सवर कुठेही शेअर करू शकतात. यामुळे अधिकाधिक लोकांना त्यांच्या बिझनेसविषयी माहिती मिळते आणि प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेसमध्ये रस असलेल्या लोकांना त्यांच्याशी मेसेजच्या माध्यमातून थेट संपर्क साधता येतो.
संबंधित लेख
- पुढील प्लॅटफॉर्म्सवर कॅटलॉग तयार आणि व्यवस्थापित कसा करावा: Android | iPhone | वेब आणि डेस्कटॉप
- पुढील प्लॅटफॉर्म्सवर तुमच्या कॅटलॉगमध्ये कलेक्शन्स तयार आणि व्यवस्थापित कशी करावीत: Android | iPhone | वेब आणि डेस्कटॉप
- पुढील प्लॅटफॉर्म्सवर ग्राहकांसोबत प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कशी शेअर करावी: Android | iPhone | वेब आणि डेस्कटॉप
- कॅटलॉग कसा पाहावा