आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो?

आपण शोधत असलेल्या माहितीसाठी निम्नलिखित विषयांवर सुद्धा नजर टाकू शकता.

मला अद्ययावत सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणाविषयी प्रश्न आहेत

आम्ही आमच्या सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण अद्ययावत केले आहे. या लेखामधून तुम्हाला या अद्यतनांबद्दल ज्या काही शंका असतील त्यांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला जाईल.

तुम्ही सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण का अद्ययावत केले आहे?

आम्ही सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण अद्ययावत केले आहे कारण त्यामुळे ते समजण्यास सोपे आणि WhatsApp ची नवीन फीचर्स आणि सर्व्हिसेस बद्दल जाणून घेण्यास मदत करते. उदाहरणार्थ, आमचे अपडेटेड सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण नवीन फीचर्स जसे की WhatsApp कॉलिंग, वेब आणि डेस्कटॉप साठी असलेले WhatsApp तसेच एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन म्हणजेच संपूर्ण कूटबद्धता याची माहिती देते, तसेच तुम्हाला आमच्या सर्व्हिसेस वापरून संवाद साधून व्यवसाय करण्यासाठी मदत करणे आम्ही योजित आहोत. त्यात हे देखील स्पष्ट केले आहे की आम्ही आता Facebook परिवारातील कंपनीचा एक भाग आहोत. जरी WhatsApp एक स्वतंत्र सर्व्हिस म्हणून कार्य करणे चालू ठेवेल तरी आम्ही काही माहिती Facebook आणि Facebook परिवारातील इतर कंपनींबरोबर शेअर करू त्यामुळे आम्हाला अधिक समन्वय साधून काम करता येईल आणि त्यामुळे Facebook आणि परिवारातील इतर कंपनींबरोबर सेवांचा अनुभव सुधारणे शक्य होईल.

मग आता WhatsApp वर जाहिराती येणार का?

आम्ही अजूनही WhatsApp वर तृतीय पक्षी जाहिरातींच्या बॅनरला अनुमती देत नाही.

भविष्यात, आम्ही असे मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आहोत ज्यायोगे तुम्ही आणि बिझनेसेस WhatsApp च्या साहाय्याने संवाद साधू शकता, जसे की ऑर्डर देणे, व्यवहार करणे, अपॉंटमेंट माहिती, डिलिव्हरी आणि शिपिंग नोटिफिकेशन, उत्पादन आणि सेवा यांचे अपडेट्स आणि मार्केटिंग करणे. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी तुमच्या फ्लाईटचे स्टेटस मिळवता येईल, तुम्ही केलेल्या खरेदीची पावती मिळवता येईल, किंवा डिलिव्हरी झाल्याची पोचपावती मिळविता येईल. तुम्हाला असे काही मेसेजेस मिळू शकतील ज्यात तुम्हाला रस असलेल्या विषयांच्या ऑफर्स असतील.

तुम्हाला स्पॅम ने हैराण करून सोडणे अशी आमची मुळीच इच्छा नाही; याप्रकारच्या सर्व मेसेजेस मध्ये तुम्ही तुमची संभाषणे व्यवस्थापित करू शकता, आम्ही तुमच्या मताचा आदर करू.

Facebook आणि Facebook परिवारातील इतर कंपनींबरोबर कोणत्या प्रकारची माहिती शेअर केली जाईल?

आम्ही असे योजित आहोत की काही माहिती Facebook आणि Facebook परिवारातील इतर कंपनींबरोबर शेअर करू त्यामुळे आम्हाला अधिक समन्वय साधून काम करणे शक्य होईल जसे की स्पॅम आणि दुरुपयोग याच्याशी लढा देऊन Facebook आणि परिवारातील इतर कंपनींबरोबर सेवांचा अनुभव सुधारणे. उदाहरणार्थ, तुम्ही आमचे अटी आणि गोपनीयता धोरण स्वीकारले की आम्ही तुमची काही खाते माहिती Facebook आणि परिवारातील इतर कंपनींबरोबर शेअर करू जसे की तुम्ही WhatsApp वर रजिस्टर करताना कोणता नंबर सत्यापित केला आहे, तसेच आमची सर्व्हिस तुम्ही अखेरची केव्हा वापरली होती.

तुम्ही WhatsApp वर शेअर केलेली कोणतीही माहिती जसे की तुमचे मेसेज, फोटो आणि खाते माहिती ही Facebook आणि परिवारातील इतर कंपनींच्या अॅप वर शेअर केली जाणार नाही. याचा अर्थ असा की जरी काही माहिती Facebook बरोबर शेअर केली असेल (जसे की तुमचा फोन नंबर) तरी ती माहिती Facebook वरील इतर लोकांना बघता येणार नाही. तसेच तुम्ही आणि तुमचे संपर्क जर WhatsApp ची नवीन सुधारित आवृत्ती वापरत असाल तर तुमचे मेसेजेस मूलभूतरित्या एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केले असतील. तुमचे मेसेजेस जेव्हा एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड असतात तेव्हा ते तुम्ही आणि तुमचे प्राप्तकर्ते सोडून इतर कोणीही ते वाचू शकत नाही - WhatsApp नाही, Facebook नाही किंवा अन्य कोणीही नाही.

तुम्ही Facebook आणि Facebook परिवारातील इतर कंपनींबरोबर माहिती का शेअर करत आहात?

WhatsApp आता Facebook कंपनी परिवारातील एक हिस्सा आहे आणि माहितीची देवाणघेवाण केल्याने आम्हाला अधिक समन्वय साधून आमच्या आणि Facebook आणि Facebook परिवारातील इतर कंपनींवरील आमच्या सर्व्हिसेसचा अनुभव सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. उदाहरणार्थ :

  • आम्ही अधिक काटेकोरपणे युनिक अर्थात अद्वितीय वापरकर्ते मोजू शकतो.
  • आम्ही स्पॅम आणि दुरुपयोगाविरुद्ध जास्त चांगल्या प्रकारे लढा देऊ शकतो.
  • जर तुम्ही Facebook वापरकर्ते असाल तर तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे मित्र सुचविले जातील आणि तुमच्याशी जास्त संदर्भ असलेल्या जाहिराती दाखविल्या जातील.

टीप : तुम्ही जर विद्यमान वापरकर्ते असाल तर तुम्ही Facebook बरोबर माहिती शेअर करू नका हे निवडू शकता. तुम्ही ही निवड कशी आणि कधी करू शकता त्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया येथे पहा.

मी Facebook वापरकर्ता नसेनच तर?

काहीच हरकत नाही. तुम्ही WhatsApp वापरणे चालू ठेऊ शकता. तुम्ही Facebook वर नवीन खाते तयार करण्याची आवश्यकता नाही.

याचा अर्थ असा आहे का की माझी माहिती इतरांना बघण्यासाठी Facebook वर शेअर केली जाईल?

तुम्ही WhatsApp वर शेअर केलेले काहीही, जसे की मेसेजेस, फोटो, आणि खाते माहिती ही Facebook किंवा Facebook परिवारातील इतर कंपनींवरील अॅप वर इतरांना बघण्यासाठी शेअर केली जाणार नाही. याचा अर्थ असा की जरी काही माहिती Facebook वर शेअर केली जाणार आहे (जसे की तुमचा फोन नंबर), ती माहिती इतरांना बघण्यासाठी Facebook वर उपलब्ध केली जाणार नाही. तसेच तुम्ही आणि तुमचे संपर्क जर WhatsApp ची नवीन सुधारित आवृत्ती वापरत असाल तर तुमचे मेसेजेस मूलभूतरित्या एन्ड टू एन्ड एन्क्रिप्ट केलेले असतील. तुमचे मेसेजेस जेव्हा एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड असतात तेव्हा ते तुम्ही आणि तुमचे प्राप्तकर्ते सोडून इतर कोणीही ते वाचू शकत नाही - WhatsApp नाही, Facebook नाही किंवा अन्य कोणीही नाही.

आमच्या अद्ययावत सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरणाबद्दल तुम्ही अधिक येथे वाचू शकता.