गटातील कोणतेही ॲडमीन आता दुसऱ्या एखाद्या सहभागी सदस्याला ॲडमीन करू शकतात. गटामध्ये कितीही ॲडमीन असू शकतात.
टीप : गटाच्या मूळ निर्माणकर्त्याला काढले जाऊ शकत नाही आणि जोपर्यंत ते स्वतः गट सोडत नाहीत तोपर्यंत ॲडमीन राहतील.
सहभागी सदस्याला ॲडमीन बनवण्यासाठी :
- WhatsApp गट गप्पा वर जा आणि त्यानंतर गट विषयावर टॅप करा.
- तुम्ही असेही करू शकता, गप्पा टॅबच्या डावीकडे स्वाईप करा. त्यानंतर अधिक > गट माहिती वर टॅप करा.
- ज्या सदस्याला ॲडमीन बनवायचे आहे त्याच्यावर टॅप करा.
- गट ॲडमीन बनवा वर टॅप करा.
ॲडमीनला पदावरून हटविण्यासाठी :
- WhatsApp गट गप्पा वर जा आणि त्यानंतर गट विषयावर टॅप करा.
- तुम्ही असेही करू शकता, गप्पा टॅबच्या डावीकडे स्वाईप करा. त्यानंतर अधिक > गट माहिती वर टॅप करा.
- ज्यांना ॲडमीन पदावरून हटवायचे आहे त्यांच्यावर टॅप करा.
- ॲडमीन पदावरून काढा वर टॅप करा.
एका वेळी अनेक सदस्यांना ॲडमीन बनविण्यासाठी :
- WhatsApp गट गप्पा वर जा आणि त्यानंतर गट विषयावर टॅप करा.
- तुम्ही असेही करू शकता, गप्पा टॅबच्या डावीकडे स्वाईप करा. त्यानंतर अधिक > गट माहिती वर टॅप करा.
- गट सेटिंग्ज > गट ॲडमीन संपादित करा वर टॅप करा.
- ज्या सहभागी सदस्यांना ॲडमीन बनवायचे आहे त्यांना निवडा.
- पूर्ण झाले टॅप करा.
एकावेळी अनेक ॲडमीनना पदावरून हटविण्यासाठी :
- WhatsApp गट गप्पा वर जा आणि त्यानंतर गट विषयावर टॅप करा.
- तुम्ही असेही करू शकता, गप्पा टॅबच्या डावीकडे स्वाईप करा. त्यानंतर अधिक > गट माहिती वर टॅप करा.
- गट सेटिंग्ज > गट ॲडमीन संपादित करा वर टॅप करा.
- ज्यांना ॲडमीन पदावरून हटवायचे आहे त्यांची निवड रद्द करा.
- पूर्ण झाले टॅप करा.