आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो?

आपण शोधत असलेल्या माहितीसाठी निम्नलिखित विषयांवर सुद्धा नजर टाकू शकता.

मी WhatsApp वेब कसे वापरू?

तुम्हाला संभाषणाचा उत्तम अनुभव यावा याकरिता WhatsApp आता मोबाईल आणि कॉम्प्युटर दोन्हीवर उपलब्ध आहे. WhatsApp वेब हे तुमच्या फोनवरील WhatsApp चे एक विस्तारीत स्वरूप आहे. तुम्ही जे मेसेजेस पाठवता ते फोन आणि तुमच्या कॉम्प्युटर मध्ये संपुर्णपणे सिन्क म्हणजेच सुसंबद्ध केलेले असतात आणि तुम्ही सर्व मेसेजेस दोन्ही डिव्हाइसेस वर बघू शकता. तुम्ही जी कृती फोनवर कराल तीच WhatsApp वेब वर प्रतिबिंबित होईल तसेच तुम्ही जी कृती तुम्ही WhatsApp वेब वर कराल तीच फोनवर वर प्रतिबिंबित होईल. सध्या WhatsApp वेब हे Android, iPhone 8.1+, Windows Phone 8.0 and 8.1, Nokia S60, Nokia S40 EVO, BlackBerry आणि BlackBerry 10 या स्मार्ट फोनसाठी उपलब्ध आहे.

WhatsApp वेब हे WhatsApp चे दुसरे खाते नसते. जेव्हा तुम्ही WhatsApp तुमचा मोबाईल आणि कॉम्प्युटर वर वापरत असता तेव्हा तुम्ही एकाच खाते दोन्ही डिव्हाइसेस वर वापरत असता.

WhatsApp वेब वापरतानाच्या कमीतकमी गरजा

 • तुमच्या फोनवर सक्रिय WhatsApp खाते असण्याची गरज आहे.
 • तुमच्या फोन व कॉम्प्युटर वर स्थिर इंटरनेट कनेक्शन असायला हवे.
 • तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरच्या ब्राउझरवर Chrome, Firefox, Opera, Safari किंवा Edge याची नवीन सुधारित आवृत्ती असायला हवी.

WhatsApp वेब वापरणे वापरणे सुरु करण्यासाठी

 1. तुमच्या कॉम्प्युटर वर web.whatsapp.com येथे जा.
 2. तुमच्या फोनवर WhatsApp उघडा.
  • Android वर : Chats screen > Menu > WhatsApp Web येथे जा.
  • Nokia S60 and Windows Phone वर : Menu > WhatsApp Web येथे जा.
  • iPhone वर : Settings > WhatsApp Web येथे जा.
  • BlackBerry वर : Chats > Menu > WhatsApp Web येथे जा.
  • BlackBerry 10 वर : Swipe down from top of the screen > WhatsApp Web.
  • Nokia S40 वर : Swipe up from bottom of screen > WhatsApp Web.
 3. तुमच्या फोनवरून तुमच्या कॉम्प्युटर वर क्यु आर कोड स्कॅन करा.

तुमच्या फोनवरून WhatsApp वेब वर नेव्हिगेट करून तुम्ही कोणत्या कॉम्प्युटर वर लॉगिन झालेले आहेत किंवा तुम्हाला कोणत्या कॉम्प्युटर वरील सक्रिय वेब सेशन मधून लॉग आऊट करायचे आहे ते पाहू शकता.

टीप : तुमच्या फोनवर अतिरिक्त डेटा चार्जेस टाळण्यासाठी आम्ही अशी शिफारस करतो की तुम्ही WhatsApp वेब वापरताना नेहमी वाय फाय ला कनेक्ट करावे.