तुम्ही तुमचे खाते WhatsApp मधून नष्ट करू शकता. खाते हटविणे ही एक पुन्हा न करता येणारी क्रिया आहे त्यामुळे जर तुम्ही अनवधानाने ते हटविले तर तुम्ही ते बदलू शकत नाही.
आपले खाते डिलीट करण्यासाठी
- WhatsApp उघडा.
- WhatsApp सेटिंग्ज > खाते > माझे खाते हटवा येथे जा.
- तुमचा फोन नंबर संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये प्रविष्ट करा. आणि तुम्हाला तुमचे WhatsApp खाते डिलिट करण्याची खात्री असेल तर, माझे खाते हटवा वर टॅप करा.
WhatsApp मधील 'माझे खाते हटवा' हे फिचर वापरल्यास हे होईल
- WhatsApp वरून तुमचे खाते नष्ट केले जाईल.
- तुमच्या मित्रमैत्रीणींच्या सर्व WhatsApp गटांमधून तुम्हाला काढले जाईल.
- तुमच्या फोनवरील WhatsApp संदेश इतिहास व तुमच्या WhatsApp च्या iCloud बॅकअप वरून तुमचे WhatsApp संदेश हटविले जातील.
टीप : आम्ही आमच्याकडून तुमचे खाते हटवू शकत नाही.
यांवर आपले खाते कसे डिलीट कराल ते पहा येथे : Android | Windows Phone | Nokia S40