जेव्हा तुम्हाला WhatsApp द्वारे संदेश येतात आणि ते प्राप्त करण्यासाठी तुमचे ॲप उघडे नसते तेव्हा तुम्हाला संकेत मिळण्यासाठी तुमचा फोन आपोआपच पुश नोटिफिकेशन्स दाखवेल. iOS ॲप्स तीन प्रकारच्या नोटिफिकेशन्स प्रदान करतात :
नोटिफिकेशन सेटिंग्ज द्वारे WhatsApp कॉलला उत्तर देण्याचे दोन मार्ग आहेत :
टीप : iOS 10 आणि कॉल इंटिग्रेशन मुळे, तुम्ही तुमच्या iPhone सेटिंग मध्ये त्या संपर्कासाठी जो रिंगटोन सेट केलेला असेल तोच रिंगटोन WhatsApp कॉल्स साठी सेट केला जाईल.
WhatsApp आणि iPhone सेटिंग्ज मध्ये तुम्ही नोटिफिकेशन्स सेटिंग्ज चालू केलेले आहे ना याची खात्री करून घ्या :
WhatsApp > सेटींग्ज > अधिसूचना येथे जा आणि संदेश आणि गट हे अधिसूचना दर्शवा हे सक्षम केलेले आहेत का ते तपासा.
तुम्ही ॲप मध्ये अनुभवणारे ध्वनी किंवा व्हायब्रेशन्स बंद करू शकता, उदाहरणार्थ तुम्ही संदेश पाठवत असताना किंवा प्राप्त करत असताना होणारे आवाज बंद करण्यासाठी WhatsApp > सेटिंग्ज > अधिसूचना > इन ॲप अधिसूचना येथे जा.
iPhone Settings > Notifications > WhatsApp येथे जा. बॅजेस, ध्वनी आणि ॲलर्ट स्टाईल साठी तुमचे प्राधान्य ठरवा (बॅनर्स, पॉप-अप ॲलर्ट, किंवा काहीच नाही). जेव्हा तुमच्या फोनची स्क्रीन लॉक असते तेव्हा जर तुम्हाला नोटिफिकेशन्स दिसायला हव्या असतील तर Show on Lock Screen सक्षम करा.
ॲलर्ट चा आवाज हा तुमच्या iPhone च्या रिंगर ने नियंत्रित केला जातो जो iPhone Settings > Sounds येथे तुम्ही सेट करू शकता. येथे तुम्ही तुमचे व्हायब्रेट प्राधान्य ठरवू शकता.
जर तुम्हाला खात्री आहे की तुमच्या iPhone सेटिंग्ज आणि WhatsApp सेटिंग्ज मध्ये तुम्ही नोटिफिकेशन सेटिंग योग्य प्रकारे सेट केलेले आहे आणि तरीदेखील तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत नसतील तर ते शक्यतो तुमच्या कनेक्शन, iOS किंवा Apple च्या पुश नोटिफिकेशन सर्व्हिस मधील समस्यांमुळे होत असते.
कृपया हे लक्षात घ्या नोटिफिकेशन डिलिव्हरी ही Apple च्या पुश नोटिफिकेशन सर्व्हिस (APNS) द्वारे नियंत्रित केली जाते, आणि WhatsApp कोणत्याही प्रकारे या सर्व्हिस मधील समस्या सोडविण्यास साहाय्य करू शकत नाही. जेव्हा तुम्ही ऑफलाईन असता तेव्हा तुमच्या फोनपर्यंत संदेश पोचविण्यासाठी APNS ला संदेश पाठविला जातो. या नोटिफेकेशन्स पोहोचण्यावर वर WhatsApp चे नियंत्रण अथवा ते पाहण्याची क्षमता नाही. ही समस्या जरी WhatsApp मध्ये असली तरी त्याचे मूळ हे APNS किंवा iOS हेच असते.
साधारणपणे, ही समस्या सोडविण्याचा एकमेव उपाय म्हणजे तुमचा फोन फॅक्टरी सेटिंग वर पुनर्संचयित करणे आणि फोन नवीन असल्याप्रमाणे सेट करणे. जर तुम्ही बॅकअप पुनर्संचयित केलात तर तुम्ही कदाचित ही समस्यादेखील पुनर्संचयित कराल.
हे देखील लक्षात घ्या की पुश नोटिफिकेशन्स साठी वैध सिमकार्ड आणि सक्रिय वाय-फाय किंवा सेल्युलर कनेक्शन असणे गरजेचे आहे.