क्रमांक बदला हे फिचर तुम्हाला तुमच्या WhatsApp खात्याशी निगडित असलेला फोन नंबर त्याच फोनवर बदलू शकण्याची परवानगी देते. हे फिचर तुम्ही तुमचा नंबर पडताळून पाहण्याअगोदर वापरणे अपेक्षित आहे.
WhatsApp वरील क्रमांक बदला हे फिचर वापरल्याने हे होईल :
- तुमची खाते माहिती (तुमच्या प्रोफाइल माहितीसह), गट आणि सेटिंग्ज तुमच्या जुन्या फोनवरून नवीन फोन नंबर वर स्थलांतरीत केले जातील; आणि
- तुमच्या जुन्या फोन नंबरशी निगडित असलेले खाते काढून टाकले जाईल ज्यायोगे तुमचे संपर्क तुमचा जुना संपर्क क्रमांक त्यांच्या WhatsApp च्या यादीमध्ये पाहू शकत नाहीत.
तुम्ही आमचे क्रमांक बदला हे फिचर जर वापरले तर तुमचा गप्पा इतिहास पूर्वीप्रमाणेच नवीन फोन नंबरसह तुमच्या फोनवर जोपर्यंत तुम्ही तोच फोन वापरात आहात तोपर्यंत साठवला जाईल.
WhatsApp च्या मेसेजिंग सेवेचा उत्तम अनुभव येण्यासाठी तुम्ही याची खात्री करून घ्या की तुमच्या सर्व WhatsApp संपर्कांनी तुमचा नवीन फोन नंबर त्यांच्या फोनच्या ॲड्रेस बुक मध्ये साठवला आहे.
क्रमांक बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्याअगोदर हे करा
- खात्री करून घ्या की तुम्ही तुमच्या या नवीन फोन नंबर वर एसएमएस आणि/किंवा कॉल्स घेऊ शकत आहात आणि तुमच्याकडे सक्रिय डेटा कनेक्शन आहे.
- खात्री करून घ्या की तुम्ही तुमचा जुना फोन नंबर तुमच्या फोनमधील WhatsApp वर सत्यापित केलेला आहे. तुम्ही तुमचा कोणता नंबर पडताळून झाला आहे ते WhatsApp > अधिक पर्याय
> सेटिंग्ज इथे जाऊन तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करून पाहू शकता.
टीप : जेव्हा तुम्ही तुमचा WhatsApp फोन नंबर बदलता, तेव्हा तुमच्या संपर्कांना ही माहिती वैयक्तिकरित्या पुरविली जात नाही. फक्त असे सदस्य जे तुमच्या बरोबर गटगप्पा शेअर करतात फक्त त्यांनाच तुम्ही नंबर बदलला असण्याची सूचना मिळते. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी WhatsApp च्या मेसेजिंग सेवेचा उत्तम अनुभव येण्यासाठी तुमचा नंबर बदलला आहे हे तुमच्या संपर्कांना कळवा.
तुमचा फोन नंबर बदलणे
तुमचा फोन नंबर WhatsApp मध्ये बदलण्यासाठी खालीलप्रमाणे करा :
- तुमच्या डिव्हाइसमध्ये नवीन नंबर असलेले नवीन सिमकार्ड घाला.
- WhatsApp उघडा.
- जुना फोन नंबर सत्यापित केलेला आहे हे तपासा. तुम्ही तुमचा कोणता नंबर पडताळून झाला आहे ते WhatsApp > अधिक पर्याय
> सेटिंग्ज इथे जाऊन तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करून पाहू शकता.
- WhatsApp > अधिक पर्याय
> सेटिंग्ज > खाते > क्रमांक बदला येथे जा.
- तुमचा जुना फोन नंबर वरील चौकटीमध्ये प्रविष्ट करा.
- तुमचा नवीन फोन नंबर खालील चौकटीमध्ये प्रविष्ट करा.
- पुढे वर टॅप करा.
- संपर्कांना सूचित करा हे जर तुम्ही चालू केले, तर तुम्हाला सर्व संपर्क, मी ज्यांच्याशी चॅट केले ते संपर्क किंवा ऐच्छिक यामधून निवड करता येईल.
- ऐच्छिक असे निवडले तर तुम्हाला ज्या संपर्कांना सूचित करायचे आहे ते निवडावे लागतील किंवा शोधावे लागतील त्यानंतर > पूर्ण झाले वर टॅप करा.
- पूर्ण झाले टॅप करा.
- तुम्हाला तुमचा नवीन फोन नंबर पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या जातील.
यांवर नवीन नंबर कसा बदलला याविषयी अधिक जाणून घ्या येथे : iPhone | Windows Phone