प्रसारण यादी फिचर वापरून तुम्ही एकाचवेळी अनेक संपर्कांना संदेश पाठवू शकता.
प्रसारण यादी ही संदेश प्राप्तकर्त्यांची ती यादी असते ज्यात तुम्ही वारंवार प्रसारण संदेश पाठवू शकता. तुम्ही त्यांना प्रत्येक वेळी निवडण्याची गरज नसते.
प्रसारण यादी तयार करण्यासाठी :
आता तुमची नवीन प्रसारण प्राप्तकर्त्यांची यादी तयार होईल. जेव्हा तुम्ही प्रसारण यादी मध्ये नवीन संदेश पाठविता तो यादीमधील सर्व प्राप्तकर्त्त्यांपर्यंत पोहोचतो. प्राप्तकर्ते तो संदेश नेहमीच्या संदेशाप्रमाणेच रिसिव्ह करतील. ते जेव्हा उत्तर देतील तेव्हा तो संदेश नेहमीच्या संदेशा प्रमाणेच तुमच्या गप्पा स्क्रीनवर दिसेल. त्यांचे उत्तर प्रसारण यादीतील इतर प्राप्तकर्त्यांना दिसणार नाही.
टीप : ज्या संपर्कांनी तुमचा नंबर त्याच्या ॲड्रेस बुक मध्ये साठवला असेल त्यांनाच तुमचे प्रसारित झालेले संदेश दिसतील. जर तुमच्या संपर्कांना तुमचे प्रसारित झालेले संदेश मिळत नसतील तर खात्री करून घ्या की त्यांनी तुम्हाला त्याच्या ॲड्रेस बुक मध्ये समाविष्ट केलेले आहे. प्रसारण याद्या या एका कडून अनेकांपर्यंत संवाद साधतात. जर तुमचे प्राप्तकर्ते समूह करून संवाद साधू इच्छित असतील तर तुम्ही गटगप्पा वापरा.
यांवर प्रसारण यादी कशी वापराल ते शिका येथे : iPhone | Windows Phone