तुम्ही WhatsApp तुमच्या फोनवर आणि तुमच्या काँप्युटरवर देखील वापरू शकता. तुम्ही तुमच्या काँप्युटरवर दोन प्रकारे WhatsApp वापरू शकता :
WhatsApp वेब आणि WhatsApp डेस्कटॉप ही तुमच्या फोनवरील WhatsApp खात्याची काँप्युटरवर आधारित एक्सटेंशन आहेत. तुम्ही जे संदेश पाठविता किंवा तुम्हाला जे संदेश येतात ते पूर्णपणे तुमच्या फोन आणि काँप्युटरशी संलग्न केलेले असतात आणि तुम्ही दोन्ही डिव्हाइसेस वर सगळे संदेश बघू शकता. तुम्ही तुमच्या फोनवर जी कोणती क्रिया कराल तीच क्रिया काँप्युटरवरील WhatsApp वर देखील केली जाईल.
तुमच्या काँप्युटरवरील ब्राउझरवरून https://www.whatsapp.com/download वर जा किंवा Apple च्या अॅप स्टोअर वरून डाउनलोड करता करा. तुमच्या काँप्युटरवर Windows 8 (किंवा त्याहून नवीन आवृत्ती) किंवा macOS 10.10 (किंवा त्याहून नवीन आवृत्ती) या ऑपरेटिंग सिस्टीम असतील तरच WhatsApp इंस्टॉल करता येईल. WhatsApp डेस्कटॉप हे नेटिव्ह पद्धतीने तुमच्या कॉंम्प्युटवर काम करते ज्यामुळे तुम्हाला नेटिव्ह डेस्कटॉप सूचना दिसू शकतील त्याहूनही उत्तम म्हणजे तुम्हाला कीबोर्ड शॉर्टकट आणि इतर देखील वापरता येईल. जर तुमची ऑपरेटिंग सिस्टीम पूर्णपणे सपोर्ट करत नसेल तर तुम्ही तुमच्या ब्राउझर वर WhatsApp वेब वापरू शकता.
तुमच्या काँप्युटरवर WhatsApp कसे इंस्टॉल करावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आमचे हा लेख वाचा.
तुमच्या डेस्कटॉप वरील Chrome, Firefox, Opera, Safari किंवा Edge ब्राउझर वर https://web.whatsapp.com उघडा आणि तुमच्या फोनच्या WhatsApp ॲप्लिकेशन मधील क्यु आर कोड स्कॅन करा. ब्राउझर वरील काही मर्यादांमुळे WhatsApp वेब वर काही फिचर कदाचित चालणार नाहीत.
WhatsApp वेब बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आमचे हा लेख पहा.