आपण WhatsApp साठी आपली स्वतःची स्टिकर्स तयार करू इच्छित असल्यास आपण त्यांना Android किंवा iOS अॅपमध्ये पॅकेज करू शकता अर्थात इंस्टॉलेशनसाठी उपलब्ध करून देऊ शकता. आपण इतर कोणत्याही अॅप प्रमाणेच स्टिकर्स ॲप Google प्ले स्टोअर किंवा Apple ॲप स्टोअर वर प्रकाशित करू शकता आणि जे लोक हे ॲप डाउनलोड करून इंस्टॉल करतील त्यांना लगेचच ती स्टिकर्स WhatsApp मधून पाठविणे शक्य होईल. WhatsApp वरील स्टिकर्स कायदेशीर, अधिकृत आणि स्वीकार करण्यायोग्य असणे आवश्यक आहे. आमच्या सेवाशर्तींमध्ये आमच्या सेवांचा स्वीकारार्ह वापर याविषयी अधिक जाणून घ्या.
आम्ही Android आणि iOS दोन्हीसाठी नमुना ॲप्स आणि कोड प्रदान केला आहे जो तुम्हाला तुमचे स्टिकर आर्ट सहज कोडमध्ये समाविष्ट करण्याचा एक सोपा मार्ग प्रदान करतो यामुळे अगदी कमी डेव्हलपिंग किंवा कोडिंग अनुभव असूनही ॲप तयार करणे शक्य होते. अनुभवी डेव्हलपर्स WhatsApp तर्फे सपोर्ट असणाऱ्या API आणि इंटरफेस संच वापरुन समृद्ध स्टिकर ॲप देखील बनवू शकतात. कृपया आपले स्वतःचे स्टिकर्स डिझाइन करण्यासाठी खालील आवश्यकता वाचा आणि नमुना ॲप्स संबंधित README फाइलमध्ये यासाठी लागण्याच्या सर्व गोष्टींची माहिती आणि महत्त्वाच्या टीपा यांचा संदर्भ घ्या.
टीप : iOS स्टिकर अॅप तयार करताना Apple अॅप स्टोअर मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करण्यासाठी, आपल्या स्वत:च्या स्टाईलसह एक युनिक यूजर इंटरफेस (UI) विकसित करणे आवश्यक आहे आणि म्हणूनच यासाठी आमच्या नमुना अॅॅप्सचा UI वापरु नका.
तुमचे स्वतःचे स्टिकर आर्ट तयार करण्यासाठी खालील आवश्यकतांची पूर्तता करणे आवश्यक आहे :
आपण WhatsApp स्टिकर पिकर किंवा ट्रेमध्ये आपल्या स्टिकर पॅकचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आयकॉन चिन्ह देखील प्रदान करणे गरजेचे आहे. ही प्रतिमा 96x96 पिक्सेल आणि 50 KB पेक्षा कमी साईझची हवी. नमुना ॲप्सशी संदर्भित असलेल्या फाईल्स मध्ये आयकॉनचा साईझ कसा कमी करावा याविषयी अधिक वाचा.
वरील आवश्यकतांव्यतिरिक्त, आम्ही आपल्या स्टिकर्सची रचना करताना खालील गोष्टी कराव्यात असे आग्रहाने सुचवितो :
#FFFFFF
स्ट्रोक जोडा. अधिक माहितीसाठी नमुना फोटोशॉप (PSD) file जरूर पहा.फाईल फॉरमॅट आणि टूल्स आवश्यकता माहितीसाठी तुम्ही तुमचे स्टिकर आर्ट योग्य फाइल स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी वापरू शकता, यासाठी नमुना ॲप्सशी संबंधित README फाइल्स पहा.
तुम्हाला स्टिकर्स निर्मिती विषयी किंवा त्यासारख्या इतर काही प्रश्न असतील तर कृपया आम्हाला developers@support.whatsapp.com येथे संपर्क साधा. इतर कोणत्याही समस्यांसाठी, WhatsApp मधून सेटिंग्ज > मदत > *आमच्याशी संपर्क साधा * येथे जा.
स्टिकर्स हे Android आणि iOS वरील WhatsApp च्या नवीन आवृत्ती वर उपलब्ध आहेत. जर तुम्हाला स्टिकर्स दिसत नसतील तर खात्री करून घ्या की तुम्ही WhatsApp अपडेट केलेले आहे. पुढील प्लॅटफॉर्म्सवर स्टिकर्स कसे वापरायचे हे जाणून घ्या : Android | iPhone