तुमच्या गोपनीयतेविषयी आम्ही सतर्क असतो. WhatsApp चे सर्व मेसेजेस आणि कॉल्स एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड म्हणजेच संपूर्णपणे कूटबद्ध केलेले आहेत. याचा अर्थ फक्त तुम्ही आणि तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधत आहात फक्त आणि फक्त तेच ते संदेश वाचू शकतात आणि इतर कोणीही अगदी WhatsApp देखील ते वाचू शकत नाहीत.
तुमचे संदेश व्यवसायांना पाठविताना, WhatsApp ते नेहमी एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन करूनच पाठवेल. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे, की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवसायाशी संपर्क करता तेव्हा त्या व्यवसायाशी संबंधित विविध व्यक्ती तुमचा संदेश पाहू शकतात. तसेच काही व्यवसाय जे आमचे WhatsApp बिझनेस सोल्युशन वापरत आहेत, ते संदेश वाचण्यासाठी, साठविण्यासाठी आणि प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या एखाद्या कंपनीला कंत्राट देऊ शकतात. अशा वेळी WhatsApp त्या कंपनीला एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड संदेश पाठवेल.
तुम्ही ज्या व्यवसायाशी संपर्कात आहात ही त्यांची जबाबदारी आहे की ते तुमच्या संदेशांच्या बाबतीत गोपनीयता धोरणाचे पालन करतील. अधिक माहितीसाठी कृपया तुम्ही त्यासंबंधित व्यवसायाशी संपर्क साधावा.
एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया हा लेख वाचा.