आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो?

आपण शोधत असलेल्या माहितीसाठी निम्नलिखित विषयांवर सुद्धा नजर टाकू शकता.

गप्पा इतिहास पुनर्संचयित करणे

WhatsApp चा गप्पा इतिहास आमच्या सर्व्हर वर साठविला जात नाही कोणतेही डिलीट केलेले संदेश आम्ही पुनर्संचयित करू शकत नाही. तुम्ही आमचे iCloud बॅकअप फिचर वापरून तुमच्या गप्पा इतिहासाचा बॅकअप घेऊ शकता आणि तो पुनर्संचयित करू शकता.

iCloud बॅकअप

तुमच्या गप्पांचा स्वतः बॅकअप घेण्यासाठी WhatsApp सेटिंग्ज > गप्पा > गप्पा बॅकअप येथे जाऊन आत्ता बॅकअप करा वर टॅप करा. तुम्ही ऑटो बॅकअप निवडून स्वयंचलित पद्धतीने ठराविक कालांतराने बॅकअप घेऊ शकता तसेच तुम्ही बॅकअप किती काळाने घेतला जावा ते देखील निवडू शकता. यामुळे तुमच्या गप्पा आणि मीडिया बॅकअप केला जाईल; तुम्ही बॅकअप मध्ये व्हिडिओ समाविष्ट करायचे की नाही हे निवडू शकता. तुमचे इंटरनेट कनेक्शन आणि बॅकअप साईझ यावर iCloud बॅकअप प्रक्रिया पूर्ण होण्याचा अवधी अवलंबून आहे.

आवश्यक पूर्तता :
 • तुमच्याकडे iOS 7 किंवा त्या नंतरची आवृत्ती असणे गरजेचे आहे.
 • तुम्ही iCloud मध्ये साइन इन असणे गरजेचे आहे ( iPhone Settings > iCloud).
 • iOS 7 साठी : Documents & Data (iPhone Settings > iCloud > Documents & Data) हे ON वर सेट असणे गरजेचे आहे.
  iOS 8 आणि पुढील आवृत्तींसाठी : iCloud Drive (iPhone Settings > iCloud > iCloud Drive) हे ON वर सेट असणे गरजेचे आहे .
 • तुमच्या iCloud आणि iPhone मध्ये पुरेशी जागा असणे गरजेचे आहे.

सेल्युलर डेटा वर iCloud वापरणे

तुम्ही जर तुमच्या सेल्युलर डेटा बाबत साशंक असाल, तर आम्ही अशी शिफारस करतो की तुम्ही तुमचा iCloud बॅकअप वाय-फाय पुरताच मर्यादित ठेवावा. सेल्युलर डेटा वापरत असताना iCloud अक्षम करण्यासाठी iOS 8 साठी iPhone Settings > iCloud > iCloud Drive येथे जा तसेच त्यापुढील आवृत्तींसाठी iPhone Settings > iCloud > Documents & Data येथे जा आणि iOS 7 आणि Use Cellular Data हे बंद करा.

iCloud मधून गप्पा इतिहास पुनर्संचयित करणे

गप्पा इतिहासामधून iCloud बॅकअप पुनर्संचयित करण्यासाठी प्रथम WhatsApp सेटिंग्ज > गप्पा > गप्पा बॅकअप येथे जाऊन iCloud बॅकअप अस्तित्वात आहे का याची खात्री करून घ्या. अखेरचा बॅकअप कधी घेतला होता हे जर तुम्हाला दिसत असेल तर अॅप डिलीट करून App Store मधून परत इंस्टॉल करा. तुमचा फोन नंबर पडताळून झाला की, तुमचा गप्पा इतिहास पुनर्संचयित करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचा अवलंब करा. iCloud चा बॅकअप करण्यासाठी ज्या काही किमान पूर्तता असतात त्या सर्व iCloud पुनर्संचयनासाठी देखील असतात. तसेच, जो फोन नंबर बॅकअपसाठी वापरण्यात आला होता तोच फोन नंबर पुनर्संचयनासाठी वापरणे गरजेचे आहे. तुम्ही दुसऱ्या WhatsApp खात्यावरून गप्पा इतिहास पुनर्संचयित करू शकत नाही. जर तुम्ही iCloud खाते शेअर केले, तर त्यामुळे तुम्ही तुमचे बॅकअप स्वतंत्र ठेऊ शकता.

iCloud वरील समस्यांचे निराकरण

जर तुम्हाला iCloud वर बॅकअप घेणे किंवा पुनर्संचयन करणे यामध्ये काही अडचणी येत असतील तर हे शक्यतो iCloud खात्यामधील काही समस्यांमुळे होण्याची शक्यता असते, WhatsApp मुळे नाही.

जर तुम्ही बॅकअप तयार करू शकत नसाल, कृपया खालील उपाय करून बघा :

 1. खात्री करून घ्या की तुम्ही iPhone Settings > iCloud मध्ये iCloud ला लॉग इन केलेले आहे.
 2. खात्री करून घ्या की iPhone Settings > iCloud येथे iCloud Drive हे चालू वर सेट केले आहे. जर तुम्ही iOS 7 वापरत असाल तर तुम्हाला iCloud Drive ऐवजी Documents & Data हा पर्याय उपलब्ध असेल.
 3. iOS 7 आवृत्तीसाठी खात्री करून घ्या की तुमचा Apple ID वापरून दुसऱ्या कोणत्याही डिव्हाईस वर Cloud Drive चालू वर सेट केलेले नाही. जर तुमचा Apple ID वापरून दुसऱ्या कोणत्याही डिव्हाईस वर Cloud Drive चालू वर सेट केलेले असले तर iOS 7 आणि त्यापूर्वीच्या डिव्हाईस वर तुम्ही डेटा अपडेट करू शकत नाही. जरी iCloud Drive हा पूर्वी चालू करून मग बंद केला असेल तर तुम्ही iOS 7 डिव्हाईसवर त्याचा बॅकअप घेऊ शकत नाही. बॅकअप घेण्यासाठी तुम्ही iOS 8 किंवा त्यानंतर ची आवृत्ती वापरणे गरजेचे आहे.
 4. खात्री करून घ्या की iCloud खात्यावर बॅकअप तयार करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. तुमच्या iCloud वर किती जागा उपलब्ध आहे हे तुम्ही iPhone Settings > iCloud > Storage येथे जाऊन तपासू शकता.
 5. जर तुम्ही सेल्युलर डेटा नेटवर्क वर बॅकअप घेण्याचा प्रयत्न करत असाल तर खात्री करून घ्या की तुम्ही iOS 8 किंवा त्यापुढील आवृत्तींसाठी iPhone Settings > iCloud > iCloud Drive येथे किंवा iOS 7 आवृत्तीसाठी iPhone Settings > iCloud > Documents & Data येथे जाऊन सेल्युलर डेटा चालू वर सेट करा.
 6. WhatsApp सेटिंग्ज > गप्पा > गप्पा बॅकअप येथे "आत्ता बॅकअप घ्या" वर क्लिक करून स्वतः बॅकअप घ्या आणि स्क्रीन जोपर्यंत "अपलोड करत आहे" तोपर्यंत WhatsApp उघडे ठेवा.
 7. दुसऱ्या एखाद्या नेटवर्कवर मॅन्युअल बॅकअप घेऊन बघा - शक्यतो असे नेटवर्क निवडा ज्यावर तुम्ही नेहमी कनेक्ट होता. iCloud असे निर्माण केले आहे की तुम्ही जेव्हा पुनर्संचयनासाठी अशा भौगोलिक स्थानावर असता जेथून तुम्ही नेहमी कनेक्ट होता अशा ठिकाणावर ते अधिक कार्यक्षम पद्धतीने चालते.

जर तुम्ही बॅकअप पुनर्संचयित करू शकत नसाल, तर कृपया खालील उपाय करून बघा :

 1. खात्री करून घ्या की जो फोन नंबर आणि iCloud खाते बॅकअपसाठी वापरण्यात आले होते तोच फोन नंबर आणि खाते पुनर्संचयनासाठी वापरत आहात.
 2. तुम्ही खात्री करून घ्या की बॅकअप पुनर्संचयनासाठी iPhone Settings > General > About.
 3. खात्री करून घ्या की iCloud Drive हे iPhone Settings > iCloud > iCloud Drive येथे चालू वर सेट केलेले आहे. जर तुम्ही iOS 7 आवृत्ती वापरत असाल तर तुम्हाला iCloud Drive ऐवजी Documents & Data हा पर्याय उपलब्ध असेल.
 4. जर iCloud Drive वापरून बॅकअप घेतला असेल तर, ज्या आवृत्ती iOS 7 किंवा त्या अगोदरच्या आहेत त्यावर तुम्ही बॅकअप पुनर्संचयित करू शकणार नाही .
 5. जर तुम्ही Apple ID वापरून iCloud Drive इतर कोणत्याही डिव्हाइससाठी चालू केले असेल, तर iOS 8 किंवा त्या पुढील आवृत्ती नसेल तर तुम्ही बॅकअप पुनर्संचयित करू शकणार नाही.
 6. दुसऱ्या एखाद्या नेटवर्कवर पुनर्संचयन करून बघा - शक्यतो असे नेटवर्क निवडा ज्यावर तुम्ही नेहमी कनेक्ट होता. iCloud असे निर्माण केले आहे की तुम्ही जेव्हा पुनर्संचयनासाठी अशा भौगोलिक स्थानावर असता जेथून तुम्ही नेहमी कनेक्ट होता अशा ठिकाणावर ते अधिक कार्यक्षम पद्धतीने चालते.

iPhone बॅकअप

तुम्ही iTunes किंवा iCloud वापरून जर पूर्वी बॅकअप केला असेल, तर तुम्ही तुमच्या जुन्या iPhone बॅकअप वरून तुमच्या WhatsApp गप्पा पुनर्संचयित करू शकता. तुमचा iPhone बॅकअप आणि पुनर्संचयित कसा कराल याविषयी Apple च्या या मदतपुस्तिका पृष्ठावर वाचा.

ई-मेल संभाषणे

तुम्हाला जर एखादे संभाषण जतन करून ठेवायचे आले तर ते तुम्ही स्वतःला ई-मेल देखील करू शकता:

 1. तुम्हाला ज्या WhatsApp गप्पा जतन करायच्या आहेत त्या उघडा.
 2. नेव्हिगेशन बार मध्ये संपर्काचे नाव किंवा गटगप्पा वर टॅप करा.
 3. तळापर्यंत स्क्रोल करून गप्पा निर्यात करा वर टॅप करा.
 4. तुम्हाला ई-मेल मध्ये मीडिया संलग्न करा किंवा मीडिया रहित ई-मेल करा ते निवडा.
 5. Mail अॅप निवडा. (किंवा अधिक पर्यायांसाठी अधिक वर टॅप करा.)
 6. तुमचा ई-मेल अॅड्रेस प्रविष्ट करा आणि पाठवा वर टॅप करा.

यांवर संदेश कसे पुनर्संचयित कराल ते जाणून घ्या येथे : Android | Windows Phone | BlackBerry | BlackBerry 10