आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो?

आपण शोधत असलेल्या माहितीसाठी निम्नलिखित विषयांवर सुद्धा नजर टाकू शकता.

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन

गोपनीयता आणि सुरक्षा आमच्या रक्तात भिनलेली आहे, आणि त्यासाठीच आमची नवीन आवृत्ती आम्ही एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड म्हणजेच संपूर्णपणे कूटबद्ध करण्यात आलेली आहे. जेव्हा एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन केलेले असते तेव्हा तुमचे संदेश, फोटो, व्हिडिओ, व्हॉइस मेसेज, डॉक्युमेंट्स, स्टेटस अपडेट्स आणि कॉल्स हे चुकीच्या हातात पडण्यापासून सुरक्षित ठेवले जातात.

एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन हे तेव्हाच उपलब्ध असेल जेव्हा तुम्ही आणि तुम्ही ज्यांना संदेश पाठवत आहेत ते सर्व WhatsApp ची नवीन सुधारित आवृत्ती वापरत असाल.

WhatsApp चे एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन ग्वाही देते की केवळ तुम्ही आणि ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही संवाद साधू इच्छित आहात तेच फक्त त्यांना वाचू अथवा ऐकू शकतात, अन्य कोणीही नाही, अगदी WhatsApp देखील नाही. तुमचे संदेश हे एका कुलुपाने सुरक्षित केलेले असतात आणि केवळ तुम्ही आणि प्राप्तकर्ता यांच्याकडेच ते कुलूप उघडून तुमचे संदेश वाचण्याची विशिष्ट किल्ली असते. अधिक सुरक्षिततेसाठी तुम्ही पाठवत असलेल्या प्रत्येक संदेशाकडे एक विशिष्ट कुलूप आणि किल्ली असते. हे सर्व ऑटोमॅटिकली होते : यासाठी कोणतेही नवीन सेटिंग चालू करावे लागत नाही किंवा तुमच्या गप्पांसाठी गुप्त गप्पा सेट कराव्या लागत नाहीत.

महत्वाचे : जर सर्व पक्ष WhatsApp ची नवीन सुधारित आवृत्ती वापरत असतील तर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन हे नेहमी सक्रिय असते. एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन बंद करण्याचा कोणताही मार्ग नाही.

तुमच्या संपर्क माहिती स्क्रीनवरील "सुरक्षितता कोड सत्यापन" ही स्क्रीन काय दर्शविते?

तुमच्या प्रत्येक गप्पांचा एक स्वतंत्र सुरक्षा कोड असतो ज्याद्वारे तुमचे कॉल्स किंवा संदेश हे एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड आहेत हे तुम्ही पडताळून पाहू शकता.

टीप : पडताळणी प्रक्रिया ही पर्यायी आहे आणि ती तुमचे संदेश एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड आहेत का तपासण्यासाठी वापरली जाते.

हा कोड संपर्क माहिती स्क्रीनमध्ये क्यु आर कोड च्या स्वरूपात आणि ६०-अंकी नंबरच्या स्वरूपात असतो. हे कोड प्रत्येक गप्पांसाठी स्वतंत्र असतात आणि तुम्ही पाठवत असलेल्या गप्पा या एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड आहेत का हे लोकांना तुम्ही पाठवत असलेले संदेश सत्यापित करून त्याची शहानिशा होऊ शकते. सुरक्षा कोड ही तुमच्या बरोबर शेअर केलेल्या विशिष्ट किल्लीचे दर्शनीय स्वरूप आहे. आणि काळजी करू नका, ही खरी किल्ली नाही, ती नेहमीच गुप्त ठेवली जाते.

तुमच्या गप्पा या एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड आहेत हे पडताळून पाहण्यासाठी

  1. गप्पा उघडा.
  2. संपर्काची माहिती स्क्रीन उघडण्यासाठी त्याच्या नावावर टॅप करा.
  3. क्यु आर कोड आणि ६०-अंकी नंबरच्या स्वरूपात असलेला कोड बघण्यासाठी एन्क्रिप्शन वर टॅप करा.

जर तुम्ही आणि तुमचे संपर्क परस्परांच्या समोर असाल तर तुमच्या पैकी एकजण दुसऱ्याचा क्यू आर कोड स्कॅन करू शकतो किंवा 60-अंकी नंबर प्रत्यक्ष बघून ते तपासू शकतो. जर तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करत असाल आणि कोड जर सारखा असेल तर हिरवी बरोबरची खूण दिसेल. ते जुळले गेल्याने तुम्ही हे खात्रीपूर्वक म्हणू शकता की तुमच्या कॉल्स आणि मेसेजेस मध्ये तिसऱ्या कोणाचा हस्तक्षेप झालेला नाही.

कोड जर जुळले नाहीत तर शक्यता आहे की तुम्ही दुसऱ्या संपर्काचा कोड स्कॅन करत असाल किंवा दुसरा फोन नंबर वापरत असाल. जर तुमच्या संपर्काने नुकतेच WhatsApp परत इन्स्टॉल केले असेल किंवा फोन बदलला असेल तर आम्ही अशी शिफारस करतो की तुम्ही त्यांना नवीन संदेश पाठवून कोड रिफ्रेश करून घ्या आणि नंतर कोड स्कॅन करा.

या लेखामध्ये सुरक्षा कोड बदलाविषयी अधिक जाणून घ्या.

जर तुम्ही आणि तुमचे संपर्क भौतिकरीत्या एकमेकांच्या जवळ नसाल तर तुम्ही त्यांना ६०-अंकी नंबर पाठवू शकता. तुम्ही तुमच्या संपर्काला हे सांगून ठेवा की जेव्हा ते कोड प्राप्त करतील तेव्हा त्यांनी तो लिहून घ्यायला हवा आणि नंतर त्यांनी त्यांच्या संपर्क माहिती स्क्रीनमध्ये एन्क्रिप्शन मध्ये जाऊन प्रत्यक्ष कोड पडताळून बघू शकता. Android, iPhone आणि Windows Phone वर शेअर बटण वापरून तुम्ही क्यू आर कोड किंवा 60-अंकी नंबर कोड हा एसएमएस किंवा इमेल इ. च्या माध्यमाने पाठवू शकता.

WhatsApp वर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन का आहे आणि लोकांची सुरक्षितता म्हणजे नक्की काय?

सुरक्षितता ही WhatsApp ने प्रदान केलेली आवश्यक अशी सेवा आहे. २०१६ मध्ये आम्ही एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन वापरून तुमचे कॉल्स आणि संदेश कूटबद्ध केले त्यामुळे तुमच्या संभाषणामधील मजकूर कोणासही कळणार नाही अगदी आम्हालाही नाही. डिजिटल सुरक्षितता ही खूप महत्वाची आहे. आम्ही अशी अनेक उदाहरणे बघितली ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा गैरवापर करून हॅकर्स लोकांची खाजगी माहिती काढतात आणि त्या चोरलेल्या माहितीचा उपयोग लोकांना फसविण्यासाठी करतात. आमची नवीन वैशिष्टये जसे की व्हिडिओ कॉलिंग आणि स्टेटस येथे देखील आम्ही एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन पुरविले आहे.

WhatsApp कडे तुमचे संदेश पाहण्याची किंवा ऐकण्याची कोणतीही क्षमता नाही. कारण WhatsApp वर आलेल्या संदेशांचे जे एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन होते ते तुमच्या फोनवर होते. एखादा संदेश पाठविण्याअगोदरच तो एका क्रिप्टोग्राफिक कुलुपाने सुरक्षित केला जातो त्याची किल्ली ही फक्त प्राप्तकर्त्याकडे असते. ही किल्ली प्रत्येक संदेशाबरोबर बदलली जाते. हे सर्व जरी पार्श्वभूमीमध्ये होत असले तरी तुम्ही तुमची संभाषणे सुरक्षित आहेत का हे तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील सुरक्षा कोड सत्यापित करून त्याची पडताळणी करू शकता.

अर्थातच, लोक आम्हाला विचारणा करीत होते की कायदेशीर अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शनचा कसा हातभार लागतो ? जगभरातील लोक सुरक्षित राहावेत यासाठी कायदा अंमलबजावणी संस्थाचा आम्ही आदरच करतो. कायदा अंमलबजावणी तर्फे ज्या नवनवीन विनंत्या येत असतात त्यांचे आम्ही काळजीपूर्वक अवलोकन करतो, त्याची शहानिशा करतो आणि नंतर योग्य त्या कायदा आणि नियमावली नुसार त्यांची वर्गवारी करून अतिसंवेदनशील विनंतीस उत्तर देतो. समाज प्रबोधन हेतू, आम्ही जी मर्यादित माहिती गोळा करतो याविषयी जे कायदे आहेत आणि ते WhatsApp कडे याची विनंती कशी करू शकतात याबद्दल माहिती आम्ही प्रकाशित केलेली आहे, जी तुम्ही येथे वाचू शकता.

हे शक्य आहे की तुम्ही एन्क्रिप्शन स्क्रीनवर टॅप करून तुम्हाला असा मेसेज दिसेल की तुमचे संदेश हे एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड नाहीत. असे होण्याचे मुख्य कारण हे असते की तुम्ही ज्या व्यक्तीला संदेश पाठवत आहेत ती व्यक्ती WhatsApp ची नवीन आवृत्ती वापरत नाहीये. एकदा का तुमच्या वैयक्तिक संपर्काने किंवा गटगप्पांमधील सर्व संपर्कांनी WhatsApp अपडेट केले की गप्पांमध्ये तुमचे संदेश एनक्रिप्टेड असल्याचा संकेत दिसेल.

अधिक माहितीसाठी WhatsApp सुरक्षा हा लेख वाचा.