आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो?

आपण शोधत असलेल्या माहितीसाठी निम्नलिखित विषयांवर सुद्धा नजर टाकू शकता.

पोचपावती तपासणे

तुम्ही पाठविलेल्या प्रत्येक संदेशासमोर बरोबरच्या खुणा दिसतात. त्या पुढील गोष्टी दर्शवितात :

  • संदेश यशस्वीरीत्या पाठविण्यात आला.
  • संदेश प्राप्तकर्त्याच्या फोनवर यशस्वीरीत्या पोहोचला.
  • प्राप्तकर्त्याने तुमचा संदेश वाचला.

गटगप्पांमध्ये दुसरी बरोबरची खूण तेव्हा दिसेल जेव्हा गटातील सर्व प्राप्तकर्त्यांना तुमचा संदेश मिळला असेल. जेव्हा तुमचा संदेश सर्व प्राप्तकर्ते वाचतील तेव्हा त्या बरोबरच्या खुणा निळ्या रंगाच्या होतील.

संदेश माहिती स्क्रीन तुम्हाला हे दर्शविते की तुमचे मेसेज कोणी आणि कधी वाचले. संदेश माहिती स्क्रीनबद्दल अधिक जाणून घ्या येथे : Android | iPhone | Windows Phone | Nokia S40 | BlackBerry | BlackBerry 10

जर तुम्हाला तुमच्या संदेशसमोर एकच बरोबरची खूण दिसत असेल तर तुमच्या WhatsApp किंवा फोनमध्ये काही गडबड आहे असे समजू नका. तुमचा संदेश पाठविला गेला परंतु तुमच्या प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचला नाही तर त्याची इतर काही करणे असू शकतात :

  • कदाचित त्यांचा फोन बंद असेल.
  • त्यांच्याकडे नेटवर्क मध्ये काही बाधा असेल.
  • त्यांनी कदाचित त्यांच्या स्क्रीनवर नोटिफिकेशन बघितले असेल परंतु अप सुरु केले नसेल (हे सहसा iPhone वापरकर्त्यांच्या बाबतीत घडू शकते)
  • त्यांनी कदाचित तुम्हाला ब्लॉक केले असेल. अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.