तुम्ही तुमच्या फोनच्या ॲप्लिकेशन स्टोअर मधून WhatsApp सहजरित्या अपडेट करू शकता. कृपया हे लक्षात घ्या की तुम्हाला जर असा संदेश येत असेल की तो संदेश या WhatsApp आवृत्ती वर सपोर्ट नाही तर तुम्हाला WhatsApp अपडेट करण्याची आवश्यकता आहे.
WhatsApp अपडेट करण्यासाठी :
- Android: प्ले स्टोअर वर जा, त्यानंतर मेनू
> माझे ॲप्स आणि गेम्स येथे टॅप करा. WhatsApp Messenger समोरील अपडेट वर टॅप करा.
- तुम्ही असेही करू शकता प्ले स्टोअर वर जा आणि WhatsApp शोधा. WhatsApp Messenger अंतर्गत इंस्टॉल करा वर टॅप करा.
- iPhone: App Store वर जा आणि Updates वर टॅप करा. WhatsApp Messenger समोरील UPDATE वर टॅप करा.
- तुम्ही असेही करू शकता App Store वर जा आणि WhatsApp शोधा. WhatsApp Messenger समोरील UPDATE वर टॅप करा.
- Windows Phone 8.1: Store वर जा, त्यानंतर Menu
> my apps > WhatsApp > update वर टॅप करा.
- तुम्ही असेही करू शकता Store वर जा आणि WhatsApp शोधा. WhatsApp > update वर टॅप करा.
- Windows Phone 10: Microsoft Store वर जा, त्यानंतर Menu
> My Library वर टॅप करा. WhatsApp समोरील Update वर टॅप करा.
- तुम्ही असेही करू शकता Microsoft Store वर जा आणि WhatsApp शोधा. WhatsApp > Update वर टॅप करा.
- KaiOS: ॲप्स मेनू मधील JioStore किंवा Store वर जा. बाजूला स्क्रोल करा आणि Social निवडा, त्यानंतर WhatsApp निवडा. OK किंवा SELECT > UPDATE वर प्रेस करा.
आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो की नेहमीच WhatsApp ची नवीन अपडेट केलेली आवृत्ती वापरा. नवीन आवृत्ती मध्ये नवनवीन फीचर्स व दुरुस्ती केली गेलेली असते.