आम्ही आपल्याला कशी मदत करू शकतो?

आपण शोधत असलेल्या माहितीसाठी निम्नलिखित विषयांवर सुद्धा नजर टाकू शकता.

गप्पा इतिहास पुनर्संचयित करणे

गूगल ड्राइव्ह किंवा लोकल बॅकअप वापरून तुम्ही तुमचा WhatsApp डेटा बॅकअप करून ठेऊ शकता. रोज रात्री म.पू.2 वाजता आपोआप लोकल बॅकअप घेतला जातो आणि तुमच्या फोनमधील एका फाईलमध्ये तुमचा डेटाबेस साठवून ठेवतो.

तुम्ही तुमच्या गप्पा आणि मीडिया गूगल ड्राइव्ह वर बॅकअप करू शकता, त्यामुळे जर तुम्ही उद्या Android फोन वापरण्यास सुरुवात केली किंवा नवीन फोन घेतलात तर तुम्ही तुमच्या गप्पा आणि मीडिया ट्रान्सफर करू शकाल.

तुम्ही गूगल ड्राइव्ह वर कसे बॅकअप कराल
 1. WhatsApp चालू करा.
 2. टॅप करा मेनू बटण > सेटिंग्ज > गप्पा > गप्पा बॅकअप.
 3. येथे तुम्ही बॅकअप वर टॅप करून लगेचच बॅकअप सुरू करा. आणि बॅक अप ची वारंवारता निश्चित करण्यासाठी गूगल ड्राइव्ह वर बॅकअप घ्या येथे टॅप करू शकता.
 4. जर तुमचे गूगल खाते अगोदरच सेट केले नसेल तर खाते जोडा यावर टॅप करा.
 5. तुमच्या बॅकअप साठी नेटवर्क निवडताना वरून बॅकअप करा वर टॅप करा. कृपया लक्षात ठेवा की सेल्युलर वर बॅकअप घेताना अतिरिक्त डेटा शुल्क आकारला जाण्याची शक्यता आहे.
गूगल ड्राइव्ह बद्दल महत्वाच्या टिपा
 • पहिला बॅकअप पूर्ण होण्यासाठी कदाचित बराच वेळ लागू शकतो. कृपया तुमचा फोन चार्जिंगला लावूनच ठेवा.
 • तुम्ही तुमच्या गप्पांचा बॅकअप किती वेळा घ्यायचा हे ठरवू शकता. कोणत्या वेळेला बॅकअप साठी कोणते Google खाते वापरायचे आणि कोणते कनेक्शन वापरायचे हे तुम्ही मेनू बटण > सेटिंग्ज > गप्पा > गप्पा बॅकअप इथे ठरवू शकता.
 • याच गूगल खात्यावर प्रत्येकवेळी गूगल ड्राइव्ह बॅकअप तयार करत असताना, पूर्वी घेतलेल्या गूगल ड्राइव्ह बॅकअप वर हा नवीन बॅकअप लिहिला जातो. जुना गूगल ड्राइव्ह बॅकअप पुनर्संचयित करण्याचा कोणताही मार्ग नाही.

बॅकअप पुनर्संचयन किंवा ट्रान्सफर

तुम्ही तुमच्या नंबरची पडताळणी केल्यानंतर WhatsApp तुम्हाला तुमच्या गप्पा आणि मीडिया पुनर्संचयित करण्यासाठी विचारेल. तसे विचारले गेले की तुम्ही पुनर्संचयित करा वर टॅप करा. जर WhatsApp बॅकअप शोधू शकत नसेल तर त्याची कारणे ही असू शकतात :

 • तुम्ही त्याच गूगल खात्यामध्ये लॉग इन केलेले नाही.
 • तुम्ही जो फोन बॅकअप तयार करताना वापरला होता तोच वापरत नाहीये.
 • तुमचे एस डी कार्ड किंवा गप्पा इतिहास करप्ट झाला आहे.
 • गूगल ड्राइव्ह खात्यावर बॅकअप फाईल अस्तित्वात नाही.

टीप : तुमच्या नवीन फोनवर डेटा ट्रान्सफर करायचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्याचा गूगल ड्राइव्ह चा वापर करणे. जर तुम्हाला तुमचा लोकल बॅकअप घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या फाईल्स संगणक, फाईल एक्सप्लोरर किंवा एस डी कार्ड वापरून ट्रान्सफर करता येतील. जर तुमचा डेटा /sdcard/WhatsApp/ मध्ये स्टोअर नसेल तर तुम्ही अंतर्गत स्टोरेज किंवा मुख्य स्टोरेज फोल्डर मध्ये कदाचित ते पाहू शकता.

थोड्या जुन्या बॅकअप ला पुनर्संचयित करण्यासाठी हे करा :

तुमचा फोन साधारण 7 दिवसात जेवढा लोकल बॅकअप तयार होतो तेवढा साधारण साठवू शकतो (गूगल ड्राइव्ह वर फक्त नुकताच तयार केलेला बॅकअप असतो). जर तुम्ही लोकल बॅकअप पुनर्संचयित करू इच्छित असाल जो फारसा नवीन नाही तर तुम्हाला खालीलप्रमाणे करावे लागेल :

 1. फाईल मॅनेजर डाउनलोड करा.
 2. फाईल मॅनेजर अॅप मध्ये sdcard/WhatsApp/Databases इथे जा. जर तुमचा डेटा एस डी कार्ड वर स्टोअर नसेल तर तुम्हाला त्याऐवजी "अंतर्गत स्टोरेज" किंवा "मुख्य स्टोरेज" दिसेल.
 3. तुम्हाला जी बॅकअप फाईल पुनर्संचयित करायची आहे तिचे नाव msgstore-YYYY-MM-DD.1.db.crypt12 वरून msgstore.db.crypt12 असे करा. हे शक्य आहे की तुमचा आधीचा बॅकअप पूर्वीचा प्रोटोकॉल वापरत असेल जसे की crypt9 किंवा crypt10. crypt एक्सटेंशन बदलू नका.
 4. WhatsApp अनइंस्टॉल करा.
 5. WhatsApp इंस्टॉल करा.
 6. पुनर्संचयित करा असे विचारल्यावर त्यावर टॅप करा.

बॅकअप व पुनर्संचयन या विषयीच्या समस्यांचे निराकरण

गूगल ड्राइव्ह वर बॅकअप करताना येणाऱ्या समस्यांसाठी खालीलप्रमाणे करा :
 1. तुम्ही तुमच्या फोन वर गूगल खाते जोडले आहे ना याची खात्री करून घ्या.
 2. तुमच्या गूगल ड्राइव्ह वर बॅकअप घेण्यासाठी पुरेशी रिक्त जागा आहे ना ते तपासा.
 3. तुमच्या फोन वर गूगल प्ले सर्विसेस इंस्टॉल आहेत ना ते तपासा. टीप : गूगल प्ले सर्व्हिसेस फक्त Android 2.3.4 आणि पुढील आवृत्तींसाठीच उपलब्ध आहे.
 4. जर तुम्ही सेल्युलर डेटा वरून बॅकअप चा प्रयत्न करत असाल तर खात्री करून घ्या की WhatsApp आणि गूगल प्ले सर्व्हिसेस या दोन्ही साठी तुमच्याकडे डेटा आहे. तुम्ही साशंक असल्यास कृपया तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधा.
 5. दुसऱ्या नेटवर्क वरून बॅकअप घेण्याचा प्रयत्न करा (उदाहरणार्थ : जर तुम्ही सेल्युलर नेटवर्क ला कनेक्ट करू शकत नसलात तर वाय-फाय ला कनेक्ट करून पहा).
जर तुम्ही गूगल ड्राइव्ह बॅकअप ला पुनर्संचयित करू शकत नसाल तर खालीलप्रमाणे करा :
 1. तुम्ही खात्री करून घ्या की तुम्ही ज्या फोन वर बॅकअप घेतला होता त्याच फोन वर पुनर्संचयन करायचा प्रयत्न करत आहात.
 2. तुमच्या गूगल ड्राइव्ह वर पुनर्संचयनासाठी पुरेशी रिक्त जागा आहे ना याची खात्री करून घ्या.
 3. तुमच्या फोन वर गूगल प्ले सर्विसेस इंस्टॉल आहेत ना याची खात्री करून घ्या . टीप : गूगल प्ले सर्व्हिसेस फक्त Android 2.3.4 आणि पुढील आवृत्तींसाठीच उपलब्ध आहे.
 4. खात्री करा की तुमची बॅटरी पूर्ण चार्ज आहे किंवा तुम्ही फोन चार्जिंगला लावूनच ठेवला आहे.
 5. तुमचा फोन सशक्त आणि स्थिर इंटरनेट कनेक्शनला जोडलेला आहे ना ते तपासा. जर सेल्युलर नेटवर्क वर पुनर्संचयन होत नसले तर वाय-फाय ला कनेक्ट करून पहा.

यांवर संदेश पुनर्संचयित कसे करायचे ते पहा येथे: iPhone | Windows Phone | BlackBerry | BlackBerry 10