तुमची आणि तुमच्या संदेशांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. WhatsApp वापरताना तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी कोणती साधने आणि वैशिष्ट्ये संरचित केली आहेत ते तुम्ही जाणून घ्यावे असे आम्हाला वाटते. तुम्हाला ऑनलाईन असताना सुरक्षित राहण्यासाठी आम्ही इतर काही रिसोर्सेसच्या लिंक्स देखील पुरविल्या आहेत.
आमच्या सेवाशर्तीं मार्फत तुम्ही WhatsApp वर सुरक्षित राहू शकता. आमच्या सेवाशर्ती त्या सर्व क्रियांना अवरोधित करते ज्यांना WhatsApp वर बंदी आहे. जसे की, आक्षेपार्ह मजकूर(स्टेटस, प्रोफाइल फोटो किंवा संदेशांमध्ये) जो अधिकृत नाही, अश्लील, बदनामीकारक, धमकी, भीतीदायक, त्रास देणारा, तिरस्कार, जातीय किंवा वांशिक दृष्ट्या आक्षेपार्ह, किंवा चिथावणी देणारा किंवा बेकायदेशीर कृतीला प्रोत्साहन देणारा, किंवा इतर काही कारणाने आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन करणारा मजकूर. आम्हाला जर असे लक्षात आले की वापरकर्त्याने आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन केले आहे तर आम्ही त्या वापरकर्त्यावर बंदी आणू.
कोणकोणत्या कृतींनी आमच्या सेवाशर्ती उल्लंघीत होतात याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या सेवाशर्तींमधील "आमच्या सेवांचा अधिकृत वापर" हा विभाग जरूर वाचा.
WhatsApp वर आम्ही काही मुलभूत सुविधा प्रदान केल्या आहेत ज्या वापरून तुम्ही सुरक्षित राहू शकता :
तुम्ही तुमचे अखेरचे पाहिलेले, प्रोफाइल फोटो आणि/किंवा स्टेटस खालील पैकी एक ठेऊ शकता :
प्रत्येकजण : तुमचे अखेरचे पाहिलेले, प्रोफाइल फोटो किंवा स्टेटस WhatsApp वरील सर्व वापरकर्त्यांना उपलब्ध असेल.
माझे संपर्क : तुमचे अखेरचे पाहिलेले, प्रोफाइल फोटो किंवा स्टेटस फक्त तुमच्या ॲड्रेस बुक मधील संपर्कांना उपलब्ध असेल.
कोणीच नाही : तुमचे अखेरचे पाहिलेले, प्रोफाइल फोटो किंवा स्टेटस कोणालाच उपलब्ध नसतील.
जर तुम्ही पोचपावत्या बंद केल्या तर तुम्ही पोचपावत्या पाठवू शकणार नाही. तसेच तुम्ही इतरांची वाचल्याची पोचपावती देखील पाहू शकणार नाही.
टीप : तुम्ही तुमच्या वैयक्तिक सेटिंग मध्ये जरी पोचपावत्या बंद केल्या असतील तरी गट गप्पांमध्ये नेहमीच पोचपावती पाठवली जाते.
पुढील प्लॅटफॉर्म्सवर गोपनीयता सेटिंग्जबद्दल अधिक जाणून घ्या : Android | iPhone | Windows Phone
तुम्ही काही संपर्कांना WhatsApp द्वारे संवाद साधण्यापासून प्रतिबंधित करू शकता. तुम्ही संपर्क ब्लॉक/अनब्लॉक केल्याने काय होते याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी कृपया ब्लॉक आणि अनब्लॉक बद्दलचे हे लेख वाचा.
तुम्ही WhatsApp वरील तुमच्या संपर्कांबरोबर काय शेअर करत आहात ते तुम्ही आता ठरवू शकता आणि आम्ही अशी शिफारस करतो की तुम्ही जे काही शेअर करत आहेत ते ठरविण्यासाठी त्याचा आधी नीट विचार करा. स्वतःला विचारा : तुम्ही जे काही पाठविलेले आहे ते इतरांनी पाहावे असे तुम्हाला वाटते का?
कृपया हे ध्यानात ठेवा की आम्ही आमची सेवा पुरविताना तुमचे मेसेज पोचले की ते संग्रहीत करत नाही. एकदा का WhatsApp वर मेसेज पोहोचला की गोपनीयता तसेच मेसेजेसची सुरक्षितता जोपासण्यासाठी आम्ही तुम्ही पाठवलेले मेसेज साठवत नाही.
असे असले तरीही, तुम्ही जेव्हा चॅट, फोटो,फाईल किंवा व्हॉइस मेसेज WhatsApp वरील इतरांशी शेअर करता तेव्हा त्यांच्याकडे या मेसेजेसची प्रत असते. ते हे मेसेजेस त्यांच्या WhatsApp वरील संपर्कांबरोबर किंवा इतर कोणाबरोबरही शेअर करू शकतात.
WhatsApp मध्ये लोकेशन फिचर देखील आहे जे तुम्ही तुमचे तेव्हाचे स्थान WhatsApp मेसेज द्वारे शेअर करण्यासाठी वापरू शकता. तुमचा ज्या लोकांवर विश्वास आहे अशाच लोकांशी तुमचे स्थान तुम्ही शेअर करा.
तुम्ही WhatsApp मध्ये जाऊन आमच्याशी संपर्क साधून तुमची समस्या नोंदवू शकता.
कृपया, तुम्हाला जेवढी माहिती देणे शक्य आहे तेवढी द्या.
महत्त्वाचे : जर तुमच्या असे लक्षात आले की एखादी व्यक्ती भावनिक किंवा शारीरिक अत्याचारास बळी पडत आहे तर कृपया नजीकच्या कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. ते अशा बाबतीत योग्य ती मदत पुरवू शकतील.
आक्षेपार्ह मजकूर असेल तर त्याची तक्रार तुम्ही आमच्याकडे नोंदवावी हे आम्ही सुचवितो. कृपया हे लक्षात घ्या की तुमच्या संदेशांची सुरक्षितता जपण्यासाठी तुमच्या संदेशांमधील मजकूर आम्हाला कधीच उपलब्ध नसतो. यामुळे अशा तक्रारीची शहानिशा करणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे यावर मर्यादा येतात.
गरज असताना तुम्ही अशा मजकुराचा स्क्रीनशॉट घेऊ शकता व इतर उपलब्ध संपर्क माहिती योग्य कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी शेअर करू शकता.
तुम्ही जेव्हा सर्वप्रथम एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मेसेज प्राप्त करता तेव्हा तुम्हाला हा नंबर परस्पर चॅट मधून स्पॅम म्हणून नोंदवायचा पर्याय उपलब्ध असतो.
तुम्ही एखादा संपर्क अथवा गट त्यांच्या प्रोफाइल माहितीद्वारे देखील खालीलप्रमाणे रिपोर्ट करू शकता :
एकदा तक्रार नोंदविल्यानंतर, तुम्हाला त्या वापरकर्त्याने पाठविलेले सर्वात अलीकडील संदेश आणि तुमची या वापरकर्त्यासह झालेली अलीकडील संभाषणाची माहिती WhatsApp ला प्राप्त होतात.
आम्हाला जर असे वाटले की एखाद्या खात्याने आमच्या सेवाशर्तीचे उल्लंघन केले आहे तर आम्ही ते खाते बॅन करू शकतो. आमच्या सेवाशर्ती नुसार आम्हाला सूचना न देता खाते बॅन करण्याचा अधिकार आहे. कृपया हे लक्षात घ्या की एखाद्या सेवाशर्तीचे उल्लंघन झाल्याची नोंद जरी झाली असली तरी जरुरी नाही की आम्ही त्या वापरकर्त्यावर बंदी आणू किंवा त्याविरुद्ध एखादी ॲक्शन घेऊ.
कोणकोणत्या कृतींनी आमच्या सेवाशर्ती उल्लंघीत होतात याविषयी आणि WhatsApp चा सुयोग्य वापर याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या सेवाशर्तींमधील "आमच्या सेवांचा अधिकृत वापर" हा विभाग जरूर वाचा.
आमच्या सिस्टिममार्फत येणाऱ्या स्पॅम मेसेजेसचे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे याला आम्ही सर्वात जास्त प्राधान्य देतो. अर्थात, तरीसुद्धा जसे नेहमीचे एसएमएस किंवा फोन कॉल्स यांच्या बाबतीत होते तसेच ज्या इतर WhatsApp वापरकर्त्यांकडे कडे तुमचा फोन नंबर आहे ते तुमच्याशी संपर्क करण्याची शक्यता आहे. म्हणूनच, तुम्हाला असे स्पॅम आणि अफवा असलेले संदेश ओळखता यावे यासाठी आम्ही तुमची मदत करू शकतो.
स्पॅम आणि अफवा तुमच्या ओळखीच्या संपर्कांकडूनच येतील असे नाही. असे संदेश चुकीची माहिती पसरवतात आणि तुमची फसवणूक करून तुम्हाला एखाद्या विशिष्ट पद्धतीने वागण्यास सांगतात. तुम्ही एखाद्या संदेशाबद्दल साशंक असाल किंवा एखादा संदेश भलताच प्रलोभनीय वाटत असेल जो खरं असण्याच्या शक्यतेबद्दल तुम्ही साशंक असाल तर तुम्ही अशा संदेशावर टॅप करू नका, तो शेअर किंवा फॉरवर्ड देखील करू नका.
अशा संदेशांपासून सावध रहा :
जर तुम्हाला एखाद्या अनोळखी संपर्कांकडून संदेश प्राप्त होत असतील तर तो नंबर स्पॅम म्हणून तुम्ही WhatsApp मधून परस्पर रिपोर्ट करू शकता.
जर तुम्हाला ओळखीच्या एखाद्या संपर्काकडून स्पॅम संदेश आला असेल तर तो संदेश लगेच डिलीट करा आणि त्यामध्ये असलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका तसेच तुमची खाजगी माहिती देखील प्रदान करू नका. तुमच्या संपर्काला सांगा की त्यांनी स्पॅम पाठविले आहे आणि त्यांना या WhatsApp सुरक्षितता पृष्ठाचा संदर्भ द्या.
तुम्ही WhatsApp मध्ये जाऊन आमच्याशी संपर्क साधून तुमची समस्या नोंदवू शकता.
जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही किंवा इतर कोणी एखाद्या क्षणी धोक्यामध्ये आहेत तर कृपया तुमच्या येथील लोकल इमर्जन्सी सर्व्हिसला संपर्क करा.
जर तुम्हाला असा एखादा मजकूर आला ज्यात ती व्यक्ती स्वतः ला इजा करून घेण्याची इच्छा व्यक्त करत आहे आणि तुम्हाला जर त्यांच्या सुरक्षेबद्दल काळजी वाटत असेल तर कृपया तुमच्या येथील लोकल इमर्जन्सी सर्व्हिसला संपर्क करा किंवा आत्महत्या प्रतिबंध हॉटलाईनशी संपर्क करा.
तुम्हाला जर असा काही मजकूर आढळला ज्यात लहान मुलांवर अन्याय किंवा अत्याचार झाल्याचे सूचित होत असेल तर कृपया National Center for Missing and Exploited Children (NCMEC) येथे संपर्क करा.