प्रोफाइल फोटो
तुमच्या गोपनीयता सेटिंग मध्ये, तुम्ही ज्या कोणाबरोबर WhatsApp गप्पा मारता त्यांना तुमचा प्रोफाइल फोटो आणि नाव हे दिसू शकते. तुमचा फोटो सेट करण्यासाठी :
- WhatsApp > अधिक पर्याय
वर टॅप करा आणि > सेटिंग्ज येथे जा.
- तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा > कॅमेरा चिन्ह निवडा.
- तुमच्या गॅलरी मधून फोटो निवडा, तुमच्या कॅमेरामधून नवीन फोटो काढा किंवा तुमचा सध्याचा फोटो काढून टाका.
नाव
- WhatsApp > अधिक पर्याय
वर टॅप करा आणि > सेटिंग्ज येथे जा.
- तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करून नंतर तुमच्या नावावर टॅप करा.
टीप : हे नाव केवळ त्याच संपर्कांना दिसेल ज्यांनी तुमचा संपर्क त्यांच्या फोनच्या अड्रेस बुक मध्ये अजूनही समाविष्ट केलेला नाही.
'माझ्याबद्दल'
- WhatsApp > अधिक पर्याय
वर टॅप करा आणि > सेटिंग्ज येथे जा.
- तुमचा प्रोफाइल फोटो टॅप करा आणि नंतर 'माझ्याबद्दल' येथे टॅप करा.
- येथे तुम्ही स्वतःबद्दल ऐच्छिक माहिती किंवा 'प्रि-फिल्ड' अर्थात अगोदरपासून भरलेली माहिती समाविष्ट करू शकता.
टीप : 'माझ्याबद्दल' हे तुम्ही रिक्त ठेऊ शकत नाही.
स्टेटस
- WhatsApp स्टेटस स्क्रीन येथे जा.
- स्टेटस चिन्हावर टॅप करा.
- तुम्ही नवीन फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता किंवा पीकर मधून आधीचा एखादा व्हिडिओ निवडू शकता, त्या नंतर पाठवा
बटणावर टॅप करा.
WhatsApp स्टेटस बद्दल अधिक माहितीसाठी कृपया हा लेख वाचा.
टीप :
- तुम्ही तुमचे गोपनीयता सेटिंग्ज स्वतःच्या इच्छेप्रमाणे ठेऊ शकता ज्यामुळे तुमचा प्रोफाइल फोटो आणि स्टेटस कोण पाहू शकेल ते तुम्ही नियंत्रित करू शकाल.
- जर तुम्ही एखादा संपर्क ब्लॉक केला, तर ती व्यक्ती तुमच्या प्रोफाइल फोटो मध्ये किंवा स्टेटस मध्ये झालेले अपडेट्स बघू शकत नाही.
यांवर प्रोफाइल आणि स्टेटस कसे सेट कराल ते पहा येथे : iPhone | Windows Phone