आम्ही खालील डिव्हाइसेसला सपोर्ट करतो आणि असे सुचवितो की तुम्ही त्यापैकी एखादे वापरावे :
तुमच्याकडे यातील एक डिव्हाइस असले की तुम्ही WhatsApp इंस्टॉल करा आणि WhatsApp वापरण्यासाठी नवीन डिव्हाईसवर तुमचा फोन नंबर पडताळून बघा. लक्षात ठेवा की, WhatsApp एकावेळी एकच फोन नंबर वापरून एका डिव्हाइस वर सक्रिय असू शकते. सध्या ऑपरेटिंग सिस्टिम वरील गप्पा इतिहास ट्रान्सफर करण्याची कोणतीही सोय नाही. आम्ही ई-मेल अटॅचमेंट च्या स्वरूपात तुमचा गप्पा इतिहास तुम्हाला पाठवू शकतो अर्थात एक्स्पोर्ट करू शकतो. तुम्ही तुमचा गप्पा इतिहास कसा एक्स्पोर्ट करायचा याविषयी अधिक जाणून घ्या येथे : Android | iPhone | Windows Phone
खालील ऑपरेटिंग सिस्टीम्स वर तुम्ही नवीन खाते तयार करू शकणार नाही तसेच असलेली खाती पुन्हा पडताळू शकणार नाही. परंतु पुढील कालावधीपर्यंत त्यांच्यावर WhatsApp वापरणे चालू ठेवता येईल :
३१ डिसेंबर २०१९ नंतर सर्व Windows Phone ऑपरेटिंग सिस्टीम, आणि १ जुलै २०१९ नंतर Microsoft Store मध्ये WhatsApp कदाचित उपलब्ध असणार नाही.
टीप : आम्ही या ऑपरेटिंग सिस्टीम्सवर सक्रिय पणे डेव्हलपमेंट करत नसल्याने काही वैशिष्ट्ये कोणत्याही वेळी कार्य करणे बंद करू शकतात.