तुम्ही पाठवत असलेल्या प्रत्येक संदेशासमोर बरोबरच्या खुणा दिसतील. त्या पुढीलप्रमाणे कार्य करतील :
संदेश यशस्वीरीत्या पाठविला.
संदेश प्राप्तकर्त्याकडे यशस्वीरीत्या पोहोचला.
प्राप्तकर्त्याने तुमचा संदेश वाचला.
गटगप्पांमध्ये जेव्हा सर्व सदस्यांकडे संदेश पोहोचेल तेव्हा दोन बरोबरच्या खुणा दिसतील. दोन निळ्या बरोबरच्या खुणांचा अर्थ हा असेल की तो संदेश सर्व गट सदस्यांनी वाचला आहे.
संदेश माहिती
तुम्ही कोणताही संदेश पाठविता तेव्हा तुम्ही तुमच्या संदेशाची माहिती स्क्रीन दिसते ज्यात तुमचा संदेश कधी पोचला, वाचला किंवा प्राप्तकर्त्यांद्वारे प्ले केला गेला ही माहिती असते.
संदेश माहिती स्क्रीन बघण्यासाठी :
- संपर्क किंवा गटाबरोबरच्या गप्पा उघडा.
- संदेशावर उजवीकडून डावीकडे स्वाईप करा.
- तुम्ही असेही करू शकता, तुम्ही पाठविलेल्या संदेशावर टॅप करून होल्ड करा आणि मेनू मधून माहिती निवडा.
संदेश माहिती स्क्रीन हे दाखवते :
- पोहोचला जेव्हा तुमचा संदेश प्राप्तकर्त्यांपर्यंत पोहोचतो परंतु त्यांनी पाहिलेला नसतो.
- वाचला किंवा पहिला जेव्हा प्राप्तकर्त्याने तुमचा संदेश अथवा प्रतिमा, ऑडिओ फाईल किंवा व्हिडिओ वाचलेला किंवा बघितलेला असतो. व्हॉइस मेसेज म्हणजेच ध्वनी संदेश असेल तर प्राप्तकर्त्याने तो पाहिलेला असतो परंतु अजून चालू करून ऐकलेला नसतो.
- वाजविले जेव्हा प्राप्तकर्त्याने तुमचा ध्वनी संदेश चालू करून ऐकलेला असतो.
टीप : लक्षात घ्या की जेव्हा सहभागी गट सोडतो तेव्हा संदेश माहिती स्क्रीन अजूनही ज्या सहभाग्यानी गट सोडला आहे त्याच्या माहितीसह पूर्वीची सर्व माहिती दाखवते.
संदेश माहिती स्क्रीन बद्दल अधिक जाणून घ्या येथे : Android | Windows Phone.
पोचपावती गहाळ असल्यास
तुम्हाला निळ्या बरोबरच्या खुणा दिसत नसतील तर त्याची कारणे ही असू शकतात :
- तुम्ही किंवा प्राप्तकर्त्याने पोचपावत्या त्याच्या गोपनीयता सेटिंग्ज मध्ये डिसेबल अर्थात अक्षम केले असण्याची शक्यता आहे.
- प्राप्तकर्त्याने कदाचित तुमचे संभाषण अजून उघडले नसेल.
- प्राप्तकर्त्याने तुम्हाला ब्लॉक केले असेल.
- तुम्ही किंवा प्राप्तकर्ता यांच्यामध्ये कनेक्शन मध्ये अडथळा असेल.
- प्राप्तकर्त्याचा फोन बंद असेल.
पोचपावती कशी बंद करता येईल
पोचपावती फिचर मधून बाहेर येण्यासाठी सेटिंग्ज > खाते > गोपनीयता येथे जा आणि पोचपावती अक्षम करा.
टीप : यामुळे गटगप्पा किंवा ध्वनी संदेशाची पोचपावती अक्षम होणार नाही. हे फिचर बंद करण्याचा कोणताही मार्ग नाही.