तुम्हाला अनधिकृत तृतीय पक्षांकडून स्पॅम येऊ शकते. WhatsApp कडून नाही.
आमच्या सिस्टिममार्फत येणाऱ्या स्पॅम मेसेजेसचे प्रमाण कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत. एकमेकांशी संवाद साधण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करणे याला आम्ही सर्वात जास्त प्राधान्य देतो. अर्थात, तरीसुद्धा जसे नेहमीचे एसएमएस किंवा फोन कॉल्स च्या बाबतीत होते तसेच ज्या इतर WhatsApp वापरकर्त्यांकडे कडे तुमचा नंबर आहे ते तुमच्याशी संपर्क करण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच असे मेसेज ओळखण्यासाठी आणि त्यांना योग्य प्रकारे हाताळण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू इच्छितो.
तुम्हाला नको असलेले संदेश अर्थात मेसेज अनधिकृत पक्षांकडून वेगवेगळ्या स्वरूपात तुमच्याकडे येऊ शकतात, जसे की स्पॅम, अफवा आणि फिशिंग मेसेजेस(तुमची खाजगी माहिती चोरण्याच्या हेतूने आलेले मेसेज). अशा प्रकारच्या सर्व मेसेजेसना साधारणपणे अनसॉलिसीटेड मेसेज म्हणजेच अनाहूत संदेश असे संबोधले जाते. हे मेसेज अनधिकृत तृतीय पक्षांकडून तुम्हाला फसविण्यासाठी किंवा तुम्हाला एखादी विशिष्ट कृती करण्यास भाग पाडण्यासाठी प्रवृत्त करतात.
जर WhatsApp द्वारे किंवा इमेल द्वारे खालील पैकी एखादा मेसेज आला असेल तर तुम्ही एखाद्या फसव्या स्कीमला बळी पडू शकता :
आम्ही नेहमी अशी शिफारस करतो की तुम्ही असे संदेश पाठविणाऱ्या व्यक्तीला ब्लॉक अर्थात अवरोधित करावे, मेसेज कडे दुर्लक्ष करून तो डिलिट करावा. ब्लॉक करण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. तुमच्या संपर्कांना अशा मेसेजेच्या भावी धोक्यापासून वाचविण्यासाठी त्यांना असे मेसेज कधीच फॉरवर्ड करू नका.
फसव्या मेसेजेस बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया आमचा ब्लॉग वाचा.