जर तुम्ही बॅन म्हणजेच प्रतिबंधित झाला असाल तर तुम्हाला WhatsApp मधून हा मेसेज दिसेल :
"तुमच्या फोन नंबरला WhatsApp वापरण्यापासून बॅन करण्यात आले आहे. मदत समितीशी संपर्क साधा."
हे लक्षात घ्या की आम्हाला जर असे वाटत असेल की आमच्या सेवाशर्तीचे उल्लंघन झाले आहे तर आम्ही ते खाते बॅन म्हणजेच प्रतिबंधित करतो.
कृपया आमच्या सेवाशर्तींमधील "आमच्या सेवांचा अधिकृत वापर" हा भाग काळजीपूर्वक वाचा आणि WhatsApp चा योग्यप्रकारे वापर कसा करावा आणि आमच्या सेवाशर्तीचे उलंघन कसे होते याविषयी अधिक जाणून घ्या.
तुमचे खाते बंद करण्याअगोदर आम्ही कदाचित चेतावणी संदेश देणार नाही. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमचे खाते चुकून प्रतिबंधित करण्यात आले आहे तर कृपया आम्हाला इमेल करा आणि आम्ही या विषयात लक्ष घालू.