iPhone वरील WhatsApp मध्ये इमोजी तयार केलेले नाहीत. iPhone मध्ये इमोजी सपोर्ट हा इमोजी कीबोर्ड वापरून तयार केलेला असतो. येथे जा iPhone Settings > General > Keyboard > Keyboards > Add New Keyboard आणि Emoji निवडा.
एकदा का इमोजी कीबोर्ड सक्षम केला की संदेश टाईप करताना ग्लोब हे चिन्ह वापरून तुम्ही त्यातील इमोजींचा वापर करू शकता.
टीप : Apple नवीन iOS आवृत्तींमध्ये नवीन इमोजी सातत्याने समाविष्ट करत असते. नवीन इमोजी मिळविण्यासाठी कृपया खात्री करून घ्या की आपण नवीन iOS आवृत्ती वापरत आहात. तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर कसे अपग्रेड करायचे याच्या सूचना Apple सपोर्ट वेबसाईटवर दिलेल्या आहेत.