तुमचा गप्पा इतिहास रिस्टोअर करणे
iCloud बॅकअप मधून तुमचा गप्पा इतिहास रिस्टोअर करा
- WhatsApp > सेटिंग्ज > गप्पा > गप्पा बॅकअप येथे तुमचा गप्पा इतिहास अस्तित्त्वात आहे का ते तपासा.
- अखेरचा बॅकअप कधी घेतला होता हे जर तुम्हाला दिसत असेल तर ॲप डिलीट करून App Store मधून परत WhatsApp इंस्टॉल करा.
- फोन नंबर पडताळून झाला की, तुमचा गप्पा इतिहास रिस्टोअर करण्यासाठी स्क्रीनवरील सूचनांचा अवलंब करा.
टीप :
- तुमचे iCloud वापरण्यासाठी तुम्ही Apple ID वापरून लॉग इन करणे गरजेचे आहे आणि iCloud Drive चालू वर सेट असणे गरजेचे आहे.
- तुमच्या iCloud आणि iPhone मध्ये पुरेशी जागा असणे गरजेचे आहे. तुमच्या बॅकअप साठी लागणाऱ्या जागेपेक्षा तुमच्या फोन मध्ये आणि तुमच्या iCloud खात्यामध्ये २.०५ पट अधिक जागा असणे आवश्यक आहे.
- जो फोन नंबर बॅकअपसाठी वापरण्यात आला होता तोच फोन नंबर पुनर्संचयनासाठी वापरणे गरजेचे आहे. तुम्ही दुसऱ्या WhatsApp खात्यावरून गप्पा इतिहास रिस्टोअर करू शकत नाही.
- iCloud खाते आणि WhatsApp वर एकच नंबर वापरल्याने जर तुम्ही iCloud खाते परिवारासोबत शेअर केले, तरी स्वतंत्र फोन नंबरमुळे तुम्ही तुमचे WhatsApp बॅकअप स्वतंत्र ठेऊ शकता.
संबंधित लेख :
- iPhone वर iCloud वर बॅकअप कसा घ्यायचा.
- iCloud वर बॅकअप निर्माण किंवा रिस्टोअर करता न येणे
हा लेख उपयुक्त का नव्हता?
आपल्या अभिप्रायासाठी आभारी आहोत.