व्यवसाय नाव हे त्या बिझनेसचे अथवा संस्थेचे निदर्शक असणे गरजेचे आहे .
व्यवसाय नाव निर्माण करण्यासाठीचे नियम
"अधिकृत व्यवसाय खाते" तयार करण्याची पात्रता मिळविण्यासाठी व्यवसाय नावामध्ये पुढील गोष्टी असू शकत नाहीत :
- नाव इंग्रजीमध्ये असल्यास, नावामध्ये सर्व अक्षरे कॅपिटल लेटर्स ठेवणे शक्य असणार नाही याला अक्रोनीम अर्थात संक्षेप अक्षरांचा अपवाद असेल. केवळ विशेष नावाचे पहिले अक्षर कॅपिटल असलेले चालू शकते.
उदाहरणार्थ :
- योग्य : Sweet Treats किंवा Tammy's Burritos and Tacos
- अयोग्य : SWEET TREATS* किंवा Tammy's Burritos And Tacos
- गरज नसलेली विरामचिन्हे.
- इमोजी.
- चिन्हे (उदाहरणार्थ : ®).
- एका मागे एक येणारी अल्फा न्यूमेरिक नसलेली कॅरेक्टर (अशी कॅरेक्टर्स जी नंबर आणि अक्षरे नाहीत).
- पुढीलपैकी कोणतेही स्पेशल कॅरेक्टर: ~!@#$%^&*()_+:;"'{}[]\|<>,/?
- "WhatsApp" या शब्दाचे कोणतेही स्वरूप. अधिक माहितीसाठी आमच्या ब्रँड गाईडलाईन्स बद्दल वाचा.
तसेच, व्यवसाय नावामध्ये खालील गोष्टी देखील असू शकत नाहीत :
- व्यक्तीचे पूर्ण नाव.
- जेनेरिक अर्थात सर्वसाधारण संज्ञा (उदाहरणार्थ : फॅशन).
- सामान्य भौगोलिक स्थान (उदाहरणार्थ : मुंबई).
- तीन पेक्षा कमी कॅरेक्टर
टीप : तुमचे व्यवसाय खाते जर "अधिकृत व्यवसाय खाते" असेल तर व्यवसाय नाव बदलल्याने त्याचे अधिकृत हे स्टेटस काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.