WhatsApp आयकॉन वर बॅज काउंट म्हणजेच संदेश संख्या चुकीची दिसणे हे शक्यतो तुमच्या फोनवरील काहीतरी समस्येमुळे होते. रिसेट करण्यासाठी कृपया खालील उपाय करून बघा :
- तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्हाला नवीन WhatsApp संदेश पाठविण्यास सांगा. यामुळे आपोआपच संदेश संख्या रिफ्रेश होईल.
- तुमच्या WhatsApp आयकॉन वर टॅप करून होल्ड करा आणि तो कचरापेटी आयकॉन वर ड्रॅग करा (तो शक्यतो तुमच्या स्क्रीनच्या वरील भागात असेल), त्यानंतर ॲप ड्रॉवर मधून नवीन WhatsApp चा आयकॉन तुमच्या होमस्क्रीनवर आणा.
- WhatsApp अनइंस्टॉल करा. सेटिंग्ज > डिव्हाइस > ॲप्लिकेशन > ॲप्लिकेशन मॅनेजर > **अधिक > सिस्टीम ॲप्स दाखवा > बॅज प्रोव्हायडर > स्टोरेज (तुमच्या फोन नुसार या क्रिया वेगळ्या असू शकतात) किंवा तुमचे बॅज मोजणारे ॲप येथे जा आणि डेटा साफ करा वर टॅप करा त्यानंतर WhatsApp परत इंस्टॉल करा.
- सेटिंग्ज > सिस्टीम > डेव्हलपर ऑप्शन्स येथे जा आणि खात्री करून घ्या की ऍक्टिव्हिटी चालू करू नका हे बंद आहे. जर तुमच्याकडे डेव्हलपर ऑप्शन्स नसतील तर ही पायरी सोडून द्या.
- सेटिंग्ज > सिस्टिम > डिव्हाइस > ॲप्लिकेशन्स > ॲप्लिकेशन मॅनेजर > WhatsApp > स्टोरेज येथे जा आणि डेटा साफ करा येथे टॅप करा. तुम्ही जेव्हा पुढच्या वेळी WhatsApp चालू कराल तेव्हा तुम्हाला तुमचा नंबर परत पडताळून घ्यावा लागेल.
बॅज नोटिफिकेशन्स संख्या ही तुमच्या लॉन्चर म्हणजेच फोन निर्मात्यातर्फे तर्फे पुरविले जाते आणि हे WhatsApp चे कार्य नाही. जर अजूनही तुम्हाला अडचणी येत असतील तर कृपया तुमच्या फोन निर्मात्या कंपनीशी संपर्क साधा.
तुमच्या ॲप वर बॅज संख्या कशी पहाल ते शिका येथे.