WhatsApp ला एखादा बॅकअप सापडत नसेल, तर त्याची कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात :
- तुम्ही बॅकअप घेण्यासाठी जे Google खाते वापरले, त्या खात्यामधून लॉग इन केलेले नाही.
- तुम्ही ज्या फोन नंबरवर बॅकअप घेतला होता, तो नंबर वापरत नाही आहात.
- तुमचे SD कार्ड किंवा पूर्वीचे चॅट करप्ट झाले आहे.
- Google ड्राइव्ह खात्यावर किंवा तुमच्या फोनच्या स्टोरेजमध्ये बॅकअप फाइल अस्तित्वात नाही.
Google ड्राइव्ह बॅकअप तयार करता न येणे
Google ड्राइव्ह बॅकअप तयार करताना समस्या येत असल्यास, कृपया खालील गोष्टी करा :
- तुमच्या फोनमध्ये Google खाते जोडले आहे याची खात्री करून घ्या.
- तुमच्या फोनवर Google प्ले सेवा हे पॅकेज इंस्टॉल केले आहे याची खात्री करून घ्या.
- तुम्ही मोबाइल डेटा वापरून बॅकअप घेण्याचा प्रयत्न करत असल्यास, तुमच्याकडे WhatsApp आणि Google Play सर्व्हिसेस या दोन्हीसाठी डेटा आहे याची खात्री करून घ्या. खात्री नसल्यास, तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधा.
- वेगळ्या नेटवर्कवरून बॅकअप घेऊन पहा. मोबाइल डेटा वापरून बॅकअप घेता न आल्यास वाय-फाय नेटवर्कला कनेक्ट करून पहा.
Google ड्राइव्ह बॅकअप रिस्टोअर करता न येणे
Google ड्राइव्ह बॅकअप रिस्टोअर करताना समस्या येत असल्यास, कृपया खालील गोष्टी करा :
- तुम्ही ज्या फोन नंबरवर बॅकअप घेतला होता त्याच फोन नंबरवर बॅकअप रिस्टोअर करायचा प्रयत्न करत आहात याची खात्री करून घ्या.
- बॅकअप रिस्टोअर करण्यासाठी तुमच्या फोनवर पुरेशी मोकळी जागा आहे याची खात्री करून घ्या.
- तुमच्या फोनवर Google प्ले सर्व्हिसेस हे पॅकेज इंस्टॉल केले आहे याची खात्री करून घ्या.
- तुमची बॅटरी पूर्णपणे चार्ज केलेली आहे किंवा तुमचा फोन चार्जिंगला लावला आहे याची खात्री करून घ्या.
- तुमचा फोनचे इंटरनेट कनेक्शन वेगवान आणि स्थिर आहे याची खात्री करून घ्या. मोबाइल डेटा नेटवर्क वापरून बॅकअप रिस्टोअर होत नसल्यास, कृपया वाय-फाय नेटवर्क वापरून पाहा.
संबंधित लेख :