जर तुमच्या ॲप मध्ये “तुमचे खाते तात्पुरते बॅन करण्यात आले आहे” असा संदेश दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही WhatsApp ची अधिकृत आवृत्ती वापरत नसून असमर्थित आवृत्ती वापरत आहात. तात्पुरते बॅन झाल्यानंतर जर तुम्ही अधिकृत आवृत्ती वापरणे सुरु केले नाही तर शक्यता आहे की तुमचे खाते WhatsApp वापरण्यापासून कायमचे प्रतिबंधित होईल.
सपोर्ट नसलेले ॲप्स जसे की WhatsApp Plus, GB WhatsApp किंवा असे ॲप्स जे असे सांगतात की तुमचे WhatsApp चे चॅट फोनच्या संदेशांमध्ये हलवतील, या सर्व WhatsApp च्या फेरफार केलेल्या अनधिकृत आवृत्त्या आहेत. हे अनधिकृत ॲप्स तृतीय पक्षांनी निर्माण केले आहेत आणि त्यांनी आमच्या सेवाशर्तींचे उल्लंघन केले आहे. WhatsApp अशा तृतीय पक्षी ॲप्सला समर्थित करत नाही कारण त्यांच्या सुरक्षितता तत्त्वाची आम्ही ग्वाही देऊ शकत नाही.
अधिकृत WhatsApp वर जाण्याअगोदर तुम्ही तुमचे पूर्वीचे चॅट बॅकअप करून ठेऊ शकता. तुम्हाला पूर्वीचे चॅट ट्रान्सफर करावे लागेल की नाही हे तुम्ही जे असमर्थित ॲप वापरत आहात त्यावर अवलंबून आहे. अधिक पर्याय > सेटिंग्ज > मदत > ॲप माहिती येथे टॅप करा आणि तुम्ही कोणते ॲप वापरात आहात ते जाणून घ्या. तुम्ही पुढील पैकी जे ॲप वापरत आहात त्यानुसार त्यांच्यासाठीचे उपाय करा : WhatsApp Plus किंवा GB WhatsApp.
तुम्ही WhatsApp Plus किंवा GB WhatsApp शिवाय दुसरे कोणते ॲप वापरत असाल तर आम्ही असे सुचवितो की तुम्ही WhatsApp ची अधिकृत आवृत्ती डाउनलोड करण्याअगोदर तुमचे पूर्वीचे चॅट कसे साठवावे.
तुमचे पूर्वीचे चॅट साठवून ठेवण्यासाठी खालील गोष्टी करा. जर तुम्ही या पायर्यांप्रमाणे कृती केली नाही तर तुमचे पूर्वीचे चॅट गहाळ होण्याची शक्यता आहे. कृपया लक्षात घ्या की ही WhatsApp ची अधिकृत आवृत्ती नसल्याने पूर्वीच्या चॅटचे ट्रान्सफर यशस्वी होईलच याची आम्ही कोणतीही हमी देऊ शकत नाही.
जर तुमचे 'पूर्वीचे चॅट' अगोदर साठवले असेल तर ते आपोआप अधिकृत WhatsApp वर स्थलांतरित होईल. तुमचे 'पूर्वीचे चॅट' कसे साठवायचे ते आमच्या मदत केंद्रावरील लेखांमध्ये जाणून घ्या.